मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज गणपतीपुळ्यात... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chief Minister Uddhav Thackeray in Ganpatipule today

 आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन असलेल्या गणपतीपुळे विकास आराखड्यातील विकासकामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज गणपतीपुळ्यात...

रत्नागिरी - आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन असलेल्या गणपतीपुळे विकास आराखड्यातील विकासकामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी (ता. १७) दुपारी १२.३० वाजता होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या स्वागतची जय्यत तयारी करण्यात आली असून, पोलिसांचा कडक बंदोबस्त गणपतीपुळेत ठेवला आहे.

शिवसेनेचा जाहीर मेळावा

सोमवारी दुपारी ११.५५ वाजता गणपतीपुळे (भंडारपुळे) येथे हेलिपॅडवर मुख्यमंत्र्यांचे आगमन होणार आहे. दुपारी १२.०० वाजता मोटारीने ते श्रीक्षेत्र गणपतीपुळेकडे रवाना होतील. श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथे श्रींचे दर्शन घेतल्यानंतर दुपारी १२.२० वाजता मोटारीने शासकीय विश्रामगृहाकडे जाणार आहेत. दुपारी १२.२५ वाजता श्रीक्षेत्र गणपतीपुळे तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी १२.३५ वाजता गणपतीपुळेतील आठवडा बाजारात शिवसेनेचा जाहीर मेळावा होणार आहे. त्यानंतर ते दुपारी दोन वाजता आंगणेवाडीला (ता.मालवण, जि.सिंधुदुर्ग) रवाना होणार आहेत.

वाचा - असा आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा...  

जिल्ह्यातील शिवसैनिक उपस्थित राहणार

मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी शिवसेनेने जय्यत तयारी केली आहे. भूमिपूजन आणि मेळाव्याच्या नियोजनाची पाहणी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्यासह खासदार विनायक राऊत यांनी केली. मेळाव्याला जिल्ह्यातील हजारो शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत. दौऱ्याची संपूर्ण जबाबदारी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. भंडारपुळे येथे दोन हेलिपॅडची व्यवस्था करण्यात आली आहे. दौऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनीही आढावा बैठक घेतली. जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. हेलिपॅडसह गणपतीपुळे मंदिर आणि आठवडा बाजार येथील मेळाव्याच्या ठिकाणी पोलिस तैनात केले आहेत.