मुख्यमंत्र्यांचा उद्या रत्नागिरी दौरा : प्रकल्प ग्रस्तांचे म्हणणे आज तरी ऐकून घेणार का..? 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 फेब्रुवारी 2020

काही दिवसांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर येणार आहेत. त्या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री ठाकरे प्रकल्प समर्थकांना भेटीसाठी वेळ देवून त्यांचे म्हणणे ऐकून घेणार का, याकडे लक्ष लागले आहे. 

राजापूर (रत्नागिरी) :  नाणार रिफायनरी प्रकल्प असो वा आंबोळगड परिसरातील प्रस्तावित आयलॉग प्रकल्प, विरोधकांच्या मागण्यांची आणि आंदोलनांची शासनाकडून जेवढी दखल घेतली गेली, तेवढी दखल समर्थकांच्या मागण्यांची घेतली गेली नाही. त्यामध्ये खासदार आणि आमदारांनी समर्थकांना दिलेल्या सापत्नभावाचाही समावेश आहे. उद्या ता. 17 रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर येणार आहेत. त्या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री ठाकरे प्रकल्प समर्थकांना भेटीसाठी वेळ देवून त्यांचे म्हणणे ऐकून घेणार का, याकडे लक्ष लागले आहे. 

भाजपसह काही सामाजिक संस्थांनी यापूर्वी जाहिररित्या या प्रकल्पांचे समर्थन केले आहे. मात्र, प्रकल्पविरोधात सूर आळवून त्याविरोधात तीव्र आंदोलन छेडणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकांकडूनही आता या प्रकल्पांचे समर्थन केले जात आहे. शिवसेनेच्या विद्यमान जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मी शिवलकर, माजी जिल्हा परिषद सदस्य विलास अवसरे, देवाचेगोठणे जिल्हा परिषद गटाचे शिवसेनेचे माजी विभागप्रमुख डॉ. सुनील राणे यांनीही या प्रकल्पांचे जाहीर समर्थन केले आहे.

हेही वाचा- *परदेशी दौऱ्याची स्वप्न पाहणाऱ्या इंजिनियरची मैदानावर अखेर...

स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीसह विकासासाठी प्रकल्पांची आवश्‍यकता असल्याचे मत त्यांनी मांडले आहे. स्थानिक खासदार असोत वा आमदार यांनी प्रकल्पविरोधकांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यांच्यासमवेत आंदोलनामध्येही हिरीरीने सहभागी झाले. मात्र, प्रकल्प समर्थकांची भेट घेण्यास वा त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याबाबत त्यांनी अनुत्सुकता दाखविली. 

हेही वाचा- वेंगुर्लेत राष्ट्रवादी महिला प्रदेश सचिवपदी नम्रता कुबल...

भेट घेण्याच्या हालचाली... 
सोमवारी (ता. 17) काही दिवसांमध्ये मुख्यमंत्री ठाकरे कोकण दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्यावेळी त्यांची भेट घेण्याच्या प्रकल्प समर्थकांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे ठाकरे प्रकल्प समर्थकांना भेट देऊन त्यांचे म्हणून ऐकून घेणार का, याची साऱ्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. 

हेही वाचा- त्या एकजुटीने देणार लढा : कशासाठी वाचा...

गेल्या काही महिन्यांत समर्थकांची संख्या वाढली 
तालुक्‍यामध्ये नाणार रिफायनरीसह आयलॉग प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्प उभारणीला काही लोकांनी विरोध केला असून त्या विरोधात आंदोलनही छेडले आहे. त्यांच्या या विरोधाला शिवसेनेने पाठिंबा देताना या प्रकल्पविरोधात भूमिका घेतली. त्याचा शिवसेनेला निवडणुकांमध्ये राजकीयदृष्ट्या फायदा झाला. तालुक्‍यातील प्रस्तावित प्रकल्पांना विरोध करणाऱ्यांची संख्या जास्त असल्याचे बोलले जात आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांमध्ये प्रकल्प समर्थकांचीही संख्या वाढली आहे.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chief Minister Uddhav Thackeray on a tour of Konkan marathi news