त्या एकजुटीने देणार लढा : कशासाठी वाचा...

Cancer Rally Public awareness in rajapur kokan marathi news
Cancer Rally Public awareness in rajapur kokan marathi news

राजापूर (रत्नागिरी ) : कमेकींच्या साथीने एकमेकांचा स्वतःचा आणि कुटुंबांचा आर्थिक, सामाजिक असा सर्वांगीण विकास साधण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या तालुक्‍यातील तुळसवडे येथील बचत गटाच्या महिलांनी कॅन्सरच्या विरोधात रणशिंग फुंकले आहे. गावामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन काढलेल्या रॅलीमध्ये महिलांनी कॅन्सर हटावचा नारा दिला. त्याचवेळी बचत गटाच्या माध्यमातून स्वतःसह कुटुंब व सर्वांगीण गावविकास साधण्याचा निर्धार करण्यात आला. 

कॅन्सरबाबत लोकांमध्ये असलेल्या विविध गैरसमजांबाबत जनप्रबोधन करण्यासाठी सोलिवडे-तुळसवडे येथील बचत गटांच्या महिलांनी नुकतीच गावामध्ये रॅली काढली होती. त्यामध्ये मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर टाटा स्मारक केंद्र, मुंबई आणि वालावलकर रुग्णालय डेरवण यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या कार्यक्रमामध्ये तोंड, घसा व अन्ननलिकेमध्ये होणाऱ्या कर्करोगाबद्दल व त्यावर प्रतिबंध कसा करता येईल, त्याबद्दल डॉ. श्रद्धा राऊत आणि डॉ. दिलीप पांचाळ यांनी मार्गदर्शन केले.

कॅन्सर जनप्रबोधनासाठी महिलां सज्ज

त्याचवेळी मानवी सावंत आणि सुजाता चिले यांनी बचत गटाच्या कामकाजासंबंधित मार्गदर्शन केले. यावेळी गावच्या सरपंच इंदिरा शिवगण, पोलिस पाटील विलासिनी कपाळे, ग्रामसेविका मासये, ग्रामपंचायत सदस्या शितल कपाळे, साक्षी आडिवरेकर, बचतगट प्रमुख प्रेक्‍क्षा जाधव, ग्रामसंघाच्या अध्यक्षा जयश्री आडीवरेकर, उपाध्यक्षा दीपाली नाफडे, सचिव सुप्रिया आडिवरेकर यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. 

हेही वाचा- मुंडेचा आदेश आणि त्या वादग्रस्त गृहपालाची अखेर बदली....

महिला बचत गटाचे जाळे विणण्याचा निर्धार 
सुवर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजनेच्या राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नत्ती अभियानांतर्गत तालुक्‍यातील तुळसवडे-सोलिवडे येथे 14 महिला बचत गटांची स्थापना करण्यात आली आहे. एकमेकांच्या साथीने बचत गटांच्या माध्यमातून महिलांसह त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवला आहे. गावामध्ये महिला बचत गटाची चळवळ कार्यरत ठेवण्यासाठी बचत गटांचा ग्रामसंघही गठित करण्यात आला आहे. या संघाच्या नेतृत्वाखाली गावामध्ये महिला बचत गटाचे जाळे विणण्याचा निर्धार करण्यात आला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com