esakal | ग्रामस्थांनी पकडले आणि पोलीसांनी सोडले, काय बरं वाचा...
sakal

बोलून बातमी शोधा

child abduction  in vaibhavwadi kokan marathi news

गुन्हा दाखल न केल्यामुळे कोळपे ग्रामस्थ आक्रमक झाले असुन त्यांनी पोलीस स्थानकात येवुन पोलीसांशी हुज्जत घातली.

ग्रामस्थांनी पकडले आणि पोलीसांनी सोडले, काय बरं वाचा...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वैभववाडी (सिंधुदुर्ग) :  सिंधुदुर्ग जिल्हयातील कोळपे ता.वैभववाडी येथील दीड वर्षाचा बालकाला पळुवन नेणाऱ्या परप्रांतीयास स्थानिक ग्रामस्थांनी पकडुन काल ता.१ रात्री पोलीसांच्या ताब्यात दिले.परंतु पोलीस स्थानकातुन तो पसार झाला.अखेर पुन्हा स्थानिक कोळपे ग्रामस्थांनी त्याला पकडुन दिले.दरम्यान गुन्हा दाखल न केल्यामुळे कोळपे ग्रामस्थ आक्रमक झाले असुन त्यांनी पोलीस स्थानकात येवुन पोलीसांशी हुज्जत घातली.त्यानतंर गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू करण्यात आली आहे.हा धक्कादायक प्रकार वैभववाडी पोलीस स्थानकात घडला आहे.

 हेही वाचा- स्थूल पोलिसांचे वजन घटवण्यासाठी हा कोर्स ठरतोय प्रभावी

कोळपे येथील एका घरातील दीड वर्षाचा बालकाला एक अनोळखी घेवुन पलायन करीत होता.हा प्रकार बालकाच्या आईने पाहिल्यानतंर आरडाओरडा केला.तत्काळ स्थानिक लोक जमा झाले त्यांनी पाठलाग करून त्या व्यक्तीला पकडुन बालकाला आईच्या स्वाधीन केले.त्यानतंर त्या अनोळखी परप्रातींयाला घेवुन नातेवाईक आणि ग्रामस्थांनी पोलीस स्थानक गाठले.पोलीसांनी त्या व्यक्तीला पोलीसांच्या स्वाधीन करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.त्यावेळी ठाणे अमंलदार यांनी नातेवाईकांचा मोबाईल नंबर घेत उद्या सकाळी आपल्याला बोलावुन घेवुन तक्रार घेतो असे सांगीतले.त्यानतंर नातेवाईक रात्री उशिरा घरी गेले.

हेही वाचा- पोस्टात पैसे जलद भरायचे आहेत मग हे ॲप डाऊनलोड करा....

ग्रामस्थ संतापले

आज सकाळी नातेवाईकांना पोलीस स्थानकातुन फोन न आल्यामुळे नातेवाईक आणि काही ग्रामस्थ पोलीस स्थानकात आले.परंतु त्यांना पकडुन दिलेली व्यक्ती पोलीस स्थानकात दिसुन आली नाही.अधिक चौकशी केल्यानतंर ती व्यक्ती   पसार झाल्याचे उघड झाले.त्यानतंर त्याचा शोध सुरू झाला.या प्रकाराने ग्रामस्थ चांगलेच संतापले.बालकाला पळवुन नेण्यासारख्या गुन्हयातील आरोपी पोलीस स्थानकातुन पसार होतोच कसा असा प्रश्‍न करीत ग्रामस्थांनी पोलीसांशी हुज्जत घातली.ग्रामस्थ आणि पोलीसांमध्ये शाब्दीक खटके उडाले.त्यानतंर त्या व्यक्तीच्या शोधावर पोलीस आणि ग्रामस्थ गेले.

हेही वाचा- करंट-अंडरकरंट : शेवटचा मासा मिळेपर्यंतची अशी लढाई...

अमंलदारावर रोष

अखेर वैभववाडी-तळेरे मार्गावरील कोकिसरे रेल्वे फाटकानजीक ती व्यक्ती रेल्वेस्थानकाच्या दिशेने जात असल्याचे ग्रामस्थांना दिसली.त्यांनी ही माहीती तत्काळ पोलीसांना दिल्यानतंर पोलीसांनी त्याला पकडुन पोलीस स्थानकात आणले.बालकाला पळवुन नेणे हा गंभीर गुन्हा काल ता.१ रात्री दाखल करून न घेतलेल्या ठाणे अंमलदाराविरोधात ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त करीत त्या अमंलदारावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.वैभववाडी पोलीस स्थानकात घडलेल्या धक्कादायक प्रकाराची चौकशी व्हावी अशी मागणी देखील संतप्त ग्रामस्थांनी केली.

loading image
go to top