बालविवाह बेतला जिवावर; प्रसूती उपचारादरम्यान गर्भवतीचा करुण अंत

याप्रकरणी पाली पोलीस स्थानकात पाच जणांवर गुन्हे दाखल
child marriage
child marriageSakal
Updated on

पाली : सुधागड तालुक्यातील परळी गावाजवळील विकासवाडी या आदिवासीवाडीतील एका 14 वर्षीय अल्पवयीन विवाहित गर्भवती (वय 14) मुलीचा नुकताच प्रसूती दरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पाच जणांवर पाली पोलिस स्थानकात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Child Marriage Death In Raigad)

या संदर्भात सहाय्यक फौजदार मोहन काळूराम म्हात्रे यांच्या फिर्यादीनुसार सविस्तर माहिती अशी की सदर पीडितेचा विवाह फेब्रुवारी 2020 मध्ये सोनू पांडू पवार (वय 55), अलका मारुती हिलम (वय 48) यांनी सागर पवार (वय 18) या तरुणाशी लावून दिला होता. त्यानंतर ही मुलगी गर्भवती झाली. सात महिन्याची गर्भवती झाल्यानंतर तिला प्रसूतीसाठी अलिबाग जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

child marriage
सोलापूर : शैक्षणिक कर्जात बॅंकांचा आखडता हात

त्यानंतर पाली पोलीस स्थानकात शुक्रवारी (ता.14) गु.र.नंबर 06/2022 भादविस कलम 376 (2), (जे )(के), 376 (3)सह बालकांचे लैगिक अपराधा पासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4,6, 10, 21,सह बालविवाह अधिनियम 2006 चे कलम 10, 11 प्रमाणे पती सागर सोनू पवार, सासरे सोनू पांडू पवार (55), सासू भुरी सोनू पवार (वय 50), वडील मारुती गोपाळ हिलम (वय 52), आई अलका मारुती हिलम (वय 48) यांच्यावर पाली पोलीस स्थानकात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदर प्रकरणाचा पुढील तपास विश्वजित काइंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक तृप्ती बोराटे करीत आहेत.

पोलिसांचे आवाहन

बालविवाह करणे हा कायद्याने गुन्हा आहे. बालविवाहाची शिकार झालेले अनेक निष्पाप मुलींना आपले प्राण गमवावे लागत आहे. वधू व वर यांच्या पालकांनी आपल्या मुलांच्या भवितव्याच्या दृष्टीने बालविवाहा सारखे गुह्याचे पाऊल उचलू नये. यामध्ये आपले अनमोल जीव गमावले जातात. यासाठी समाजात प्रबोधन व जनजागृती करण्यावर भर दिल्यास अल्पवयीन विवाह पद्धतीला आळा बसेल व बालकांचे लैगिक शोषण होण्यापासून रोखले जाईल असे आवाहन पाली पोलिसांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Rajapur's Historic British-Era Warehouse Gets New Life with ₹2 Crore Restoration
Adani, Reliance, NTPC MoUs Signed; Konkan Nuclear Project Site Not Finalised
Ratnagiri food safety raid on fake paneer
Mumbai Goa Highway landslide update
Marathi News Esakal
www.esakal.com