सोलापूर : शैक्षणिक कर्जात बॅंकांचा आखडता हात

जिल्ह्यातील दहा हजार ७९७ विद्यार्थ्यांना २०२१-२२ या वर्षात शैक्षणिक कर्ज मिळणे अपेक्षित होते.
Education Loan
Education LoanSakal
Updated on

सोलापूर : जिल्ह्यातील दहा हजार ७९७ विद्यार्थ्यांना २०२१-२२ या वर्षात शैक्षणिक कर्ज मिळणे अपेक्षित होते. आर्थिक वर्ष संपायला दीड महिन्यांचा अवधी आहे, परंतु आतापर्यंत जिल्ह्यातील बॅंकांनी केवळ आठ टक्‍केच विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज दिल्याची वस्तूस्थिती समोर आली आहे.

ऑनलाइन परीक्षांमुळे बहुतेक विद्यार्थ्यांची टक्‍केवारी वाढली असून पुढे नोकरीचीही शाश्‍वती वाटत नसल्याने बॅंक अधिकारी चिंतेत आहेत. या पार्श्‍वभूमीवर सोलापूर असो वा पुणे, येथील बहुतेक बॅंकांनी शैक्षणिक कर्जासाठी हात आखडता घेतल्याची स्थिती आहे. राज्यातील अवघ्या १९ टक्‍केच विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज मंजूर झाले आहे. नवीन व्यावसायिकांसाठी मुद्रा योजना निघाली, परंतु त्याची थकबाकी वाढल्याने बॅंकांनी ते कर्जवाटपही कमी केले आहे.

Education Loan
खेड-शिवापूर टोलनाक्यावर 14 लाखांचा गुटखा जप्त

दरम्यान, उच्च शिक्षणासाठी मोठा खर्च होतो आणि हुशार, होतकरू मुलांच्या पालकांना तो खर्च पेलवत नाही. अशा परिस्थिती बॅंकांनी शैक्षणिक कर्जाच्या माध्यमातून त्या मुलांना अर्थसहाय करणे अपेक्षित आहे. कर्ज मंजूर करताना त्या मुलाच्या पालकांना जामीनदार म्हणून घेतले जाते. मुलाचे शिक्षण पूर्ण होऊन तो नोकरीला लागल्यानंतर त्या शैक्षणिक कर्जाची वसुली केली जाते. मात्र, कोरोनामुळे मागील दोन वर्षांत हजारो तरुणांचा जॉब गेला असून असंख्य उच्चशिक्षित युवक रोजगाराच्या शोधात पुणे, मुंबईत फिरत आहेत.

अशा परिस्थितीत कोरोनामुळे शाळा-महाविद्यालयांच्या परीक्षा ऑनलाइन झाल्या आणि त्यात ८० टक्‍क्‍यांहून अधिक मुले प्रथमश्रेणीत उत्तीर्ण झाले. त्या मुलांना भविष्यात त्याची अपेक्षापूर्ती होणारा जॉब मिळेल का आणि तो बॅंकेचे कर्ज नियमित परतफेड करेल, यासाठी बॅंकांनी निकषांवर बोट ठेवायला सुरवात केल्याची स्थिती आहे. शिक्षणाचे माहेरघर म्हणून नावलौकिक असलेल्या पुणे जिल्ह्यातील नऊ हजार ३०५ मुलांना शैक्षणिक कर्ज मिळावे, असे उद्दिष्ट आहे. मात्र, आतापर्यंत तीन हजार ६४० विद्यार्थ्यांना अवघे ९४ लाखांचे कर्ज मिळाल्याची माहिती अग्रणी बॅंकेच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली.

Education Loan
कात्रज : भूमिपूजनाच्या वादातून दोन नगरसेवकांची भर रस्त्यात हमरीतुमरी

शैक्षणिक कर्जाची सद्यस्थिती...

विद्यार्थ्यांचे टार्गेट

१०,७९७

कर्जवाटपाचे अंदाजित उद्दिष्ट

३१६.१० कोटी

आतापर्यंत कर्जवाटप

८ टक्‍के

कोरोनामुळे यंदा कॉलेज उशिरा सुरू झाले, परीक्षाही वेळेत झाल्या नाहीत. त्यामुळे शैक्षणिक कर्जवाटपाचा टक्‍का यंदा कमी झाला आहे. पात्र विद्यार्थ्यांना सर्व बॅंकांनी कर्ज द्यावे, असे निर्देश दिले आहेत.

- प्रशांत नाशिककर, जिल्हा व्यवस्थापक, अग्रणी बॅंक, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Emergency Rural Safety System Suspended in Solapur Over Lack of Funds
 Inspector of Police
MLA Dr. Babasaheb Deshmukh
Congress spokesperson Hanumant Pawar criticizes BJP over Ram Mandir credit politics and 'Ladki Bahin' scheme policy
Marathi News Esakal
www.esakal.com