esakal | चीन, इंडोनेशियाची जहाजे अंजनवेलजवळ
sakal

बोलून बातमी शोधा

चीन, इंडोनेशियाची जहाजे अंजनवेलजवळ

दाभोळ - भारतीय तटरक्षक दल व यंत्रणांची परवानगी न घेता भारतीय सागरी हद्दीत प्रवेश करणाऱ्या इंडोनेशियन व चिनी मच्छीमारी बोटींची चौकशी तटरक्षक दल, सीमाशुल्क विभाग व सागरी पोलिसांकडून करण्यात येत आहे. मात्र, या बोटींमध्ये काही संशयास्पद आढळलेले नाही. दोन्ही बोटींत ३५ कर्मचारी आहेत. बोटी अंजनवेलजवळील समुद्रात ६ जूनपासून आहेत.

चीन, इंडोनेशियाची जहाजे अंजनवेलजवळ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

दाभोळ - भारतीय तटरक्षक दल व यंत्रणांची परवानगी न घेता भारतीय सागरी हद्दीत प्रवेश करणाऱ्या इंडोनेशियन व चिनी मच्छीमारी बोटींची चौकशी तटरक्षक दल, सीमाशुल्क विभाग व सागरी पोलिसांकडून करण्यात येत आहे. मात्र, या बोटींमध्ये काही संशयास्पद आढळलेले नाही. दोन्ही बोटींत ३५ कर्मचारी आहेत. बोटी अंजनवेलजवळील समुद्रात ६ जूनपासून आहेत.

समुद्रातील आंतरराष्ट्रीय हद्दीत वादळाचा धोका उत्पन्न झाल्याने या दोन बोटी भारतीय सागरी हद्दीत आश्रयाला आल्या असल्याचा अंदाज आहे. अंजनवेल दीपगृहापासून अर्धा नॉटीकल मैल हद्दीत एक इंडोनेशियन व एक चिनी अशा दोन मच्छीमारी बोटी आढळून आल्या. भारतीय कोस्ट गार्ड, सीमाशुल्क विभाग व सागरी पोलिस यांनी या बोटी थांबवून ठेवल्या आहेत.

या बोटींच्या कप्तानांची चौकशी सुरू आहे. या मच्छीमारी बोटी अत्याधुनिक यंत्रणांनी सुसज्ज आहेत. एका बोटीत सॅटेलाईट फोन असून, त्याचा वापर भारतीय हद्दीत आल्यावर केला गेला. भारतीय यंत्रणांच्या ते लक्षात आल्यावर या कारवाईस सुरवात करण्यात आली. भारतात सॅटेलाईट फोनचा वापर करण्यावर बंदी करण्यात आली आहे. मात्र, या दोन बोटींवरील एक बोटीवरून या फोनचा वापर करण्यात आला असल्याची चर्चा आहे. 

या दोन्ही बोटी दुरुस्तीसाठी दाभोळ येथील भारती शिपयार्ड येथे येत होत्या. भारतातील सीमाशुल्क विभागाकडून परवानगी घेण्यासाठी या बोटींच्या कंपनीने रत्नागिरी येथील एक शिपिंग एजंटही नेमला होता. या एजंटकडे या बोटींची सर्व कागदपत्रे तसेच बोटींवरील सर्व क्रू मेंबर्सच्या पासपोर्टच्या प्रती पाठविण्यात आल्या होत्या. मात्र, या एजंटने ही कागदपत्रे सीमाशुल्क विभागाच्या दापोली कार्यालयात सादर केली नसल्याने हा गोंधळ उडाला, अशी चर्चा आहे.

चौकशी संयुक्‍तरीत्या
दापोली सहायक सीमाशुल्क आयुक्‍त यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या दोन बोटींची संयुक्‍तरीत्या चौकशी करीत असून, आम्ही अजून कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोचलेलो नाही. या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती देता येत नसल्याचे सांगितले. खेड विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रवीण पाटील आज सकाळी या बोटींवर पोचले. ‘एटीएस’च्या अधिकाऱ्यांनीही चौकशी सुरू केली असून, शिपिंग एजंटकडूनही माहिती घेतली जात आहे.

loading image