esakal | 'महाविकास आघाडीसह भाजप नेत्यांचा सन्मान करणार' - सामंत
sakal

बोलून बातमी शोधा

chipi airport

'महाविकास आघाडीसह भाजप नेत्यांचा सन्मान करणार' - सामंत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कुडाळ : चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळ हे सिंधुदुर्ग वासियांचे आहे. त्यामुळे या ठिकाणी आमचे श्रेय नाही तर जिल्हावासियांचे खरे श्रेय आहे, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगून या विमानतळाच्या उद्घाटनासाठी येणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांसह भाजपच्या नेत्यांचा सन्मान आम्ही करणार आहोत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा: Corona Update : राज्यात दिवसभरात २ हजार 943 रुग्ण बरे होऊन घरी परतले

चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळाचे उद्या 9 ऑक्टोंबर रोजी उद्घाटन होणार आहे. या विमानतळावर पहिले प्रवासी विमान उतरणार आहे आणि या सोहळ्याची उत्सुकता सिंधुदुर्ग वासियांना असून कोविडचे नियम पाळून हे उद्घाटन होणार आहे. मर्यादित निमंत्रित व्यक्तींच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा असणार आहे. या सोहळ्याची झालेली तयारी आज शुक्रवारी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक तसेच जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे तसेच आयआरबी, एमआयडीसी यांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, कोणत्याही प्रकारे या ठिकाणी वादा ची भाषा होणार नाही सर्वांना समान दिला जाणार आहे. कारण हे विमानतळ सिंधुदुर्ग वासियांचे आहे या ठिकाणी अजून विमान सेवा कशी सुरु होईल त्यासाठी आवश्यक असणारे असणाऱ्या पर्यटनाच्या सुधारणा केल्या जातील. पर्यटनाबरोबरच या ठिकाणी असलेली देव-देवतांची मंदिरे यांच्याकडे सुद्धा लक्ष देऊन भाविक याठिकाणी कसे येतील हे सुद्धा पाहिले जाईल, असे सांगून आम्हाला या विमानतळाच्या उद्घाटनाचे भाग्य लाभले हेच आमच्यासाठी सर्वात मोठे आहे.

हेही वाचा: मुंबई विद्यापीठ उभारणार संगीत महाविद्यालय : कुलगुरूंनी दिले आश्वासन

तर यावेळी खासदार विनायक राऊत यांनी सांगितले की, या विमान सेवेबरोबरच आठवड्यातून तीन वेळा शिर्डी येथे विमान सेवा सुरू करण्यासंदर्भात एअरलाइन्स कंपनीशी बोलणे झाले आहे याबाबतही लवकर चाचपणी करुन सिंधुदुर्ग ते शिर्डी अशी विमानसेवा सुरू करण्याचा आमचा मनोदय आहे.

चोख पोलिस बंदोबस्त

या विमानतळाच्या उद्घाटनासाठी मुंबई, रायगड, रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे कोणत्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये याकडे प्रशासनाचा लक्ष आहे हे उद्घाटन ठरावीक निमंत्रित उपस्थित असले तरी सर्व पक्षाचे कार्यकर्ते या परिसरात येण्याची शक्यता आहे आणि त्या कार्यकर्त्यांमध्ये कोणत्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये याकडे पोलिस यंत्रणा लक्ष ठेवू नये यासाठी हा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

loading image
go to top