esakal | Mumbai: मुंबई विद्यापीठ उभारणार संगीत महाविद्यालय : कुलगुरूंनी दिले आश्वासन
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई विद्यापीठ

मुंबई विद्यापीठ उभारणार संगीत महाविद्यालय : कुलगुरूंनी दिले आश्वासन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई विद्यापीठात मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाने संगीत महाविद्यालय शासकीय की विद्यापीठाच्या अंतर्गत उभे केले जावे, यावर तब्बल तीन तासांहून अधिक वेळ याच विषयावर मोठा गदारोळ झाला. युवा सेनेच्या सदस्यांनी यासाठी थेट वेलमध्ये जाऊन ठिय्या आंदोलन केले आणि कुलगुरू विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे 15 मिनिटे कामकाज तहकूब करण्याची वेळ विद्यापीठ प्रश्नावर ओढवली.

युवा सेनेच्या सदस्यांनी सुरू केलेल्या गदारोळातून शिताफीने मार्ग काढत कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी विद्यापीठाच्या कालिना संकुलात मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाने आणि विद्यापीठाच्याच अंतर्गत महाविद्यालय उभे करण्याचे आश्वासन दिले. तसेच यासाठी सोमवारी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊ आणि याविषयी पाठपुरावा करू असेही स्पष्ट केले.

हेही वाचा: पिंपरी : सफाई कामगारांना सानुग्रह अनुदानापासून वंचित

युवा सेनेच्या प्रदीप सावंत, शीतल शेठ देवरुखकर, महादेव जगताप, शशिकांत धोत्रे, डॉ. धनराज कोहचाडे, सुप्रिया करंडे, अ‍ॅड. वैभव थोरात, प्रवीण पाटकर, मिलिंद साटम आणि निखिल जाधव आदींनी संगीत महाविद्यालय उभे करण्यासाठी स्थगन प्रस्ताव मांडला होता. यावर सुरुवातीला आपल्याकडे सरकारकडून महाविद्यालय उभे करण्यासाठी प्रस्ताव आला नाही तर केवळ बैठकीचे मिनिट आल्याचे सांगितल्याने सदस्यांनी त्यावर आक्षेप घेत यासाठी मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन हा विषय जाहीर केला होता, त्यामुळे त्यावेळी गायिका उषा मंगेशकर याही उपस्थित होत्या, त्यामुळे तुम्ही मुख्यमंत्र्यां चा अपमान करत असल्याचे सांगत प्रदीप सावंत यांनी कुलगुरूंना धारेवर धरले.

तसेच मुख्यमंत्र्यांनी प्रस्ताव आणला म्हणून त्यासाठी विद्यापीठाने त्याच्या राजकारणाचा बळी पडू नये, असेही सावंत यांनी कुलगुरूंना ठणकावून सांगितले. तसेच शासनाने पाठवलेला प्रस्ताव राज्यपालांकडे का पाठवला असा सवाल केला.

हेही वाचा: राज्यसेवेच्या जागा वाढल्याने विद्यार्थी खूश

दरम्यान, प्र कुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांनी विद्यापीठात सलग अडीच एकर हून अधिक मोकळी जागा कुठेही नसल्याचे सांगितले. कुलगुरूंनी आपण यासाठी राज्यपालांना दून वेळा भेटल्याचे सांगत याविषयी शासनाने पाठवलेल्या पत्रात स्पष्टता नसल्याने आपण तो प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवला असल्याचा खुलासा केला.त्यानंतर आपल्याला नीट उत्तर मिळत नसल्याने युवा सेनेच्या सदस्यांनी मोठा गदारोळ करत ठिय्या आंदोलन सुरू केले.

यानंतर शासानाचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित असलेल्या उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालक डॉ. सोनाली रोडे यांनी सोमवारी कुलगुरू आणि मंत्र्यांची बैठक आयोजित करू असे निवेदन दिले. त्यामुळे नरमाईची भूमिका घेत कुलगुरूंनी संगीत क्षेत्रात करियर करू इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना उत्तोमत्तम ज्ञान व मार्गदर्शन मिळावे यासाठी राज्य सरकारने मास्टर दिनानाथ मंगेशकर संगीत महाविद्यालय उभे करण्याची घोषणा केली.

loading image
go to top