रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील घडशीवाडी येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेत, एका महिलेने दुसरीही मुलगी झाल्याने आपल्या एक महिन्याच्या बाळाला पाण्याने भरलेल्या बादलीत बुडवून ठार मारले (Ratnagiri Infanticide Case) होते. जिल्ह्याला हादरवून टाकणारी ही घटना ५ मार्च २०२१ रोजी घडली होती. तपासाअंती न्यायालयाने (Chiplun Court) या आईला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.