

चिपळूण : तालुक्यातील खडपोली- रामवाडी येथील वाशिष्ठी नदीच्या डोहात बुडून माय-लेकरू व आत्याचा मृत्यू झाला. दुपारी अडीच वाजता ही घटना घडली. तिघांचे मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.