चिपळूण : वीजदर वाढणार, ग्राहकांना ‘शॉक’ बसणार! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

electricity bill

चिपळूण : वीजदर वाढणार, ग्राहकांना ‘शॉक’ बसणार!

चिपळूण : वीज ग्राहकांना नव्या इंधन समायोजन आकारातील वाढीमुळे प्रतियुनिट सरासरी एक रुपया मोजावा लागणार आहे. मागील चार महिन्यांत वीज खरेदीवर मोठ्या प्रमाणात खर्च झाला आहे. तो सगळा आता या जादा वीज बिल दरातून भरला जाणार आहे. ‘महावितरण’च्या ग्राहकांवर या महागाईचा परिणाम होणार आहे. साधारणतः ८० ते ३०० रुपये प्रतिमहिना इतकी वाढ वीजबिलात होऊ शकते.

कोळसा आणि इंधनाचे दर वाढल्याने इंधन समायोजन आकारामध्ये वाढ करण्यात येणार असल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. जूनपासून ऑक्टोबरपर्यंत जो इंधन समायोजन आकार आहे, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वीज नियामक आयोगाने वीज बिलातून इंधन समायोजन आकार वसुलीसाठी वीज कंपन्यांना मंजुरी दिली आहे. याचा परिणाम थेट सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. विजेच्या दरात यामुळे वाढ होणार असून परिणामी वीज बिल महागणार आहे.

अधिवेशनात सरकारचे लक्ष वेधणार

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जलविद्युत केंद्रे आहेत. पाटण तालुक्यात कोयना धरण आहे. चिपळूण तालुक्यात वीजनिर्मिती केंद्र आहे. त्यामुळे या भागाला इंधन समायोजन आकारातून वगळण्यात यावे, अशी मागणी आमदार शेखर निकम यांनी केली आहे. पावसाळी अधिवेशनात ते या विषयाकडे सरकारचे लक्ष वेधणार आहोत, अशी माहिती त्यांनी ‘सकाळ’ला दिली.

अशी आहे दरवाढ

० ते १०० युनिटसाठी पूर्वी १० पैसे मोजावे लागत. ६५ पैशांपर्यंत मोजावे लागतील. १०१ ते ३०० युनिटसाठी २० पैसे मोजावे लागत. १ रुपये ४५ पैशांपर्यंत मोजावे लागतील.

Web Title: Chiplun Electricity Tariff Onsumers Shocked

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top