चिपळूण : पोफळीतील प्रकल्पग्रस्त घेणार ऊर्जामंत्र्यांची भेट

विद्युत भवन येथे मंगळवारी बैठक
डॉ. नितीन राऊत
डॉ. नितीन राऊतsakal
Updated on: 

चिपळूण : राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत हे २१ जूनला रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्याबरोबर कोयना प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसदर्भात बैठकीचे आयोजन केले आहे. रत्नागिरी विद्युत भवन येथे दुपारी २ वाजता बैठक होणार आहे.

कोयना प्रकल्पासाठी पोफळी परिसरातील शेतकऱ्यांच्या सर्वाधिक जागांचे संपादन झाले. मात्र, प्रकल्पग्रस्तांना शासनाकडून पुरेशा सुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या नाहीत. प्रकल्पग्रस्त दाखल्यासह नोकऱ्यांसाठी अजूनही प्रकल्पग्रस्तांचे शासन दरबारी खेटे सुरू आहेत. अनेकांनी नोकऱ्या आणि दाखल्यांसाठी उपोषण आंदोलन केले राज्यकर्त्यांकडून त्यांना आश्वासने मिळाली. मात्र, बहुतांशी प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. महानिर्मिती कंपनी सहज जलसंपदा विभागात नोकऱ्या मिळाव्यात, अशी प्रकल्पग्रस्तांची मागणी आहे.

महानिर्मिती कंपनीमध्ये एकूण ९० कोयना प्रकल्पग्रस्त गेली १० वर्षांपासून प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी योजनेंतर्गत कार्यरत आहेत. १५ निर्वाह भत्ताधारक यांचे कंपनी आणि सरकारी धोरणामुळे ४५ वयोमर्यादा बाद होऊन निर्वाह भत्ताधारक होण्याची वेळ आली. प्रगत कुशल योजनेंतर्गत काम करणारे तरुण अनेक वर्षापासून महानिर्मिती कंपनीमध्ये येण्यासाठी धडपड करत आहेत. ६५ वर्षांपासून प्रकल्पग्रस्तांचा लढा सुरू आहे. उर्जामंत्री रत्नागिरी येथे येणार असल्यामुळे प्रकल्पग्रस्तांचे शिष्टमंडळ त्यांची रत्नागिरी येथे भेट घेणार आहे. सर्व प्रकल्पग्रस्ताना काँग्रेस, शेतकरी कष्टकरी संघटनेच्या वतीने संघटित करण्यात येत आहे.

जलविद्युत प्रकल्प बाधितांना आवाहन

कोयना जलविद्युत प्रकल्प बाधितांच्या नोकऱ्यांसाठी, जे प्रकल्पग्रस्त अस्थायी नोकरीवर आहेत, जे प्रकल्पग्रस्त आयटीआय होऊनही ज्यांना कामावरच घेतले गेले नाही, ज्या प्रकल्पग्रस्तांना फक्त निर्वाह भत्त्यावरच कित्येक वर्षे काम करून घेतले जाते, परंतु वय उलटूनही कायम नोकरीत सामावून घेतले नाही, ज्या प्रकल्पग्रस्तांचे प्रकल्प बाधित म्हणून मिळालेले दाखले जमा करून घेतले आहेत आणि त्यांच्या वारसांचा रोजगाराचा हक्क त्यामुळे गेला, अशा कोयना जलविद्युत प्रकल्प बाधितांनी दुपारी २ वाजता रत्नागिरी येथील विद्युत

भवन येथे जमावे, असे आवाहन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Ratnagiri MIDC water storage 2026
Sayaji Shinde pays tribute to trees by visiting the deforested area in Karjat
Rare Indian bat species in Western Ghats
Thackeray Sena activists protest against the Gokul expert directors’ voting rights decision in Kankavli.