राधानगरी धरणाच्या अत्याधुनिक दरवाजांची योजना मार्गी लागण्याची शक्यता

राधानगरी धरणाच्या अत्याधुनिक दरवाजांची योजना मार्गी लागण्याची शक्यता

यंदाच्या पूरस्थितीने या धरणाला अत्याधुनिक तंत्राच्या दरवाजे बसवण्याचा विषय पुन्हा ऐरणीवर आला.
Published on

राधानगरी : खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी विशेष दखल घेतल्याने राधानगरी धरणाला अत्याधुनिक तंत्राचे दरवाजे (स्वयंचलित दरवाजे वगळून) बसविण्याची योजना आगामी काळात मार्गी लागण्याची शक्यता बळावली आहे. स्वयंचलित दरवाजांच्या अभ्यासाबरोबरच तज्ज्ञांची मते आजमावून निर्णय घेण्याचे कोल्हापूर दौऱ्यात (kolhapur visit) स्पष्ट केले. यातून धरणाला दरवाजे बसविण्याच्या योजनेला आता राजकीय इच्छाशक्तीचे पाठबळ मिळाले आहे.

यंदाच्या पूरस्थितीने (kolhapur flood) या धरणाला अत्याधुनिक तंत्राच्या दरवाजे बसवण्याचा विषय पुन्हा ऐरणीवर आला. उपमुख्यमंत्र्यांनी या विषयी गांभीर्याने लक्ष देऊन कार्यवाहीच्या दृष्टीने आश्वासक पाऊल उचलले आहे. हे धरण पूर्ण भरल्यानंतर स्वयंचलित दरवाजे खुले होतात. पाणीसाठ्यात वाढ होईल त्याप्रमाणात टप्प्याटप्प्याने पाणी विसर्गाची व्यवस्था नाही. त्यासाठी धरणाला रिडल गेट बसविण्याची गरज यापूर्वीच जलसंपदा विभागाने स्पष्ट केली. त्यादृष्टीने तांत्रिक पाहणीनंतर दोन पर्यायी योजना चर्चेत आल्या. प्रत्यक्षात योजनेची निश्चिती झालीच नाही.

राधानगरी धरणाच्या अत्याधुनिक दरवाजांची योजना मार्गी लागण्याची शक्यता
पन्हाळ्याला रस्ता नाही, मग कार्यालये हलवूया! अनेकांचा उपद्व्याप

वर्षानुवर्षे रिडलगेटची योजना कागदावरच राहिली. त्यानंतर काही महिन्यापूर्वी धरणाच्या सर्व्हिसगेटचे (सेवाद्वार) ऑटोमायजेशन केले. जुने यांत्रिकी दरवाजे (स्वयंचलित दरवाजे वगळून) काढून अत्याधुनिक तंत्र असलेले ऑटोमाईझ्ड गेट बसवण्याची योजना जलसंपदा विभागाने पुढे आणली. मात्र, अंतिम निर्णयाला चालढकल सुरू राहिली आहे. अतिवृष्टी काळातच धरण पूर्ण भरून स्वयंचलित दरवाजे खुले झाल्यास पूरस्थिती बिकट होते. हा गेल्या काही वर्षातील कटू अनुभव आहे. आधी धरणाला रिडलगेटची योजना केवळ विचाराधीनच राहिली. आता सर्व्हिस गेटचे ऑटोमायजेशन योजनेची तीच गत होणार नाही याची दक्षता यंत्रणेला घ्यावी लागणार आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाचे महत्त्व अधोरेखित

आता उपमुख्यमंत्र्यांनीच या विषयाला हात घातल्याने धरण दरवाजांच्या समस्येच्या उकलेची दिरंगाई संपणार आहे. धरणाच्या मजबुतीकरणाची योजना 1980 च्या दशकात तीन टप्प्यात प्रस्तावित झाली. यातील दोन टप्प्यांचे काम पूर्ण झाले. मात्र, तिसऱ्या टप्प्यातील सांडवा पुनर्बांधणीचे (रिडल गेट) काम झालेच नाही. गेले चार दशके केवळ प्रस्तावितच राहिले, तर धरणाचे स्वयंचलित दरवाजे खुले होण्याआधी आपत्कालीन दरवाजे तात्काळ सुरू करता येतील अशी व्यवस्था करावी, अशी सूचना जागतिक बँकेच्या प्रतिनिधींनी दोन वर्षांपूर्वी धरण पाहणी वेळी केली आहे. यातून पूरस्थिती नियंत्रणासाठी आणि धरण सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक तंत्राच्या दरवाजांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.

राधानगरी धरणाच्या अत्याधुनिक दरवाजांची योजना मार्गी लागण्याची शक्यता
यंत्रमाग उद्योगाप्रश्नी पुन्हा संघर्ष करणार; प्रकाश आवाडेंचा इशारा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com