'चिपळूणची पूररेषा रद्द ही केंद्राच्या अखत्यारीतील बाब'

मंत्री जयंत पाटील; गाळ काढल्यानंतर पुन्हा सर्वेक्षण, धोरणाबाबत निर्णय
Jayant Patil
Jayant Patilsakal

चिपळूण : चिपळुणात शहरवासीयांना विश्वासात न घेता, लाल आणि निळ्या पूररेषा मारण्यात आल्या. त्यानंतर अभूतपूर्व पूर आला. या पूररेषांना नागरिकांचा विरोध असून त्यामुळे ९० टक्के चिपळूण शहर बाधित होणार आहे. ही पूररेषा रद्द करण्यासह चिपळूण बचाओ अशी हाक देणाऱ्या समितीला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पूररेषा पूर्णपणे रद्द करणे, हा आमच्या अखत्यारीत नाही तर तो केंद्राचा विषय आहे. परंतु आपण त्याला स्थगिती दिली असून गाळ काढल्यानंतर पुन्हा सर्वेक्षण करू आणि नंतर या नवीन धोरण तयार करण्यासंदर्भात निर्णय घेऊ. चिपळूण बचाव समितीने याबाबत निश्चित राहावे, असे आश्वासित केले.

Jayant Patil
औरंगाबाद : चाळीस शाळांमध्ये गणित शिक्षकांची कमतरता

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी चिपळूण बचाव समितीच्या शिष्टमंडळाला काल (ता. १३) चर्चेसाठी पाचारण केले असता जयंत पाटील यांनी त्यांच्या खात्याची भूमिका मांडली. बैठकीला ना. बाळासाहेब थोरात यांच्याबरोबरच पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, बंदरविकास मंत्री अस्लम शेख, आयुक्त पाटील तसेच माजी खासदार हुसेन दलवाई, माजी आमदार हुस्नबानू खलपे, भाई जगताप उपस्थित होते तर दूरदृश्य प्रणालीवरून पालकमंत्री अनिल परब, ना. उदय सामंत, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आमदार शेखर निकम, जिल्हाधिकारी बी. एन. पाटील उपस्थित होते.

गाळ जर फुकट काढून नेण्याची परवानगी दिली तर...या विषयावर मंत्री उदय सामंत यांनी सविस्तर भूमिका मांडली. ही सर्व कार्यवाही पूर्ण करण्यास फार वेळ जाईल तसेच स्थानिक पातळीवर अनेक अडचणी निर्माण होतील. विषय किचकट बनेल. त्यापेक्षा सरकार कडूनच हे काम होऊ द्या लवकरात लवकर तरतूद करून कामाला सुरुवात करणे गरजेचे असल्याचे नमूद करतानाच त्यांनी येथील रेड व ब्ल्यू पूररेषा कायमस्वरूपी रद्द करण्याची थेट मागणी केली.

Jayant Patil
जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना देणार इंग्रजीचे धडे, मात्र, सेमी इंग्लीश शाळेसाठी शिक्षकांची कमतरता

मी तुमच्या समोर हात जोडतो..

मी तुमच्यासमोर हात जोडतो, अशी भावनिक साद घालत आमदार शेखर निकम म्हणाले, माझ्या कोकणाने तुमच्याकडे कधीच काही मागितले नाही. पण हे संकटच इतके मोठे आहे की, आता तुम्हाला द्यावेच लागेल. माझ्या कोकणाला व माझ्या चिपळूणला या संकटातून वाचवा मी तुमच्या समोर हात जोडतो. तातडीने तरतूद करण्याची माझी मागणी आहे.

सदस्यांनी दिली तपशीलवार माहिती

चिपळूण बचाव समितीकडून या बैठकीत जेष्ठ सदस्य अरुण भोजने यांनी सुरुवातीलाच स्पष्ट भूमिका घेत प्रास्ताविक करताना अनेक मुद्दे मांडले. शहनवाज शहा व राजेश वाजे यांनी तांत्रिक विषयांची अभ्यासपूर्वक मांडणी करून गाळ कसा व किती आहे. जुवाडे बेटे किती. खाजगी किती? शासकीय किती.? याबाबत सविस्तर अशी माहिती समोर ठेवून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते. सतीश कदम व किशोर रेडीज यांनी उपोषणकर्त्यांची भूमिका आणि जनतेचा आक्रोश याबाबत विस्तृत माहिती दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com