esakal | Chiplun Flood : चिपळूणात पुरात अडकले 1200 हून अधिक लोक; मदतीचे आवाहन
sakal

बोलून बातमी शोधा

Chiplun Flood : चिपळूणात पुरात अडकले 1200 हून अधिक लोक

Chiplun Flood : चिपळूणात पुरात अडकले 1200 हून अधिक लोक

sakal_logo
By
राजेश कळंबटे/

चिपळूण (रत्नागिरी) : ढगफुटीने चिपळूण (Chiplun Flood Live) शहरासह परिसरात पुराचे पाणी शिरल्यामुळे हाहाकार माजला आहे. घरा-घरात पाणी शिरले असून चिपळूण शहरातील विविध ठिकाणच्या 1200 हून अधिक लोक अडकली आहेत. त्यांना सोडविण्यासाठी स्थानिक प्रशासनासह एनडीआरएफची पथके कार्यरत झाली आहेत. कळंबस्ते भागशाळेजवल जिथे वाशिष्ठीचा प्रवाह भयंकर आहे तिथे रात्रीपासून 15 माणसे घराच्या छतावर अडकलेत. चिपळूण पेठमाप येथे किरण अनंत चव्हाण यांचे घरात पाणी शिरल्यामुळे 7 माणसे अडकली आहेत. पोचरी मोहल्ला मुल्ला यांचे घर पाण्याखाली गेले आहे. (1200-people-stuck-in-Chiplun-flood-breaking-news-konkan-rain-update-akb84)

गोवळकोट कोंबरवडी धावळी नाका 35 लोक अडकली आहेत. मद्रे काशी येथे 1000 लोक पाण्यात अडकण्याची शक्यता आहे. शंकरवाडी येथे मलिक कृष्णा यांच्या वसाहतीत पाणी भरल्याने 2 व्यक्ती अडकल्या आहेत. पिंपळी येथे श्वेता सदानंद दळवी यांचे घरात पाणी शिरले आहे. तिथे 10 व्यक्ती अडकल्या आहेत. पराग प्रफुल्ल बागवे यांचे घरात पाणी शिरल्यामुळे अंशतः नुकसान टेरव येथे अपराध हॉस्पीटल येथे 6 माणसे अडकली आहेत . चिपळूण येथे वाणी आळी येथे श्रीमती दक्षता चौधरी या घरात अडकल्या आहेत. संदीप गायकर चिपळूण बाजारपेठ डायमंड मार्केट बील्डींगमध्ये पाणी शिरले आहे .

हेही वाचा: नागरिकांच्या सुरक्षेसाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज; पालकमंत्री परब

60-70 लोक पाण्यात अडकली आहेत . सौरभ श्रीवास्तव गुहागर हायवेरोड येथे अडकला आहे . चिचनाका येथे सुरेश शिंदे वगैरे 4 घरात पाणी शिरल्याने घराचे पत्र्यावर बसले आहेत . अशोक कदम व सुवर्णा कदम द्वारका रेसिडन्सी गुहागर बायपास रोड तागमाळा चिपळूण येथे अडकले आहेत , स्वरुपा मोहिरे मेन बाजारपेठ , रमेश जोशी लक्ष्मीनारायण मंदीर जोशी वाडी घरात पाणी भरल्याने अडकले आहेत .

दिलीप चिपळूण , दिपाली चिपळूणकर पुराच्या पाण्यामुळे मयुर फुटवेअर दुकानात अडकले आहेत . कृष्णा चव्हाण डेअरी मॅनेजर , कोकणे हे दोघे पुराच्या पाण्यामुळे चिपळूण डेअरी खेडी एम आय डी सी येथे अडकले आहेत , संतोष पाटील व 3 माणसे पाणी घुसल्यामुळे छपरावर घडून बसलेने अडकले आहेत . दादासाहेब चव्हाण सोबत 4 व्यक्ती शंकरवाडी येथे पुराच्या पाण्यात अडकले आहेत . भारतीय समाजसेवा केंद्र संस्था मार्कडी चिपळूण येथे 0-6 वयोगटातील मुले अडकली आहेत . रानवी येथे संध्या सखाराम कांबळे यांचे घरात पाणी शिरल्याने अंशतः नुकसान . आंबा घाट येथील रस्ता खचल्याने वाहतूक बंद आहे. ग्रामपंचायत परटवली येथे पाणी भरले असून सौंदळ ग्रामपंचायत येथे पाणी भरले आहे.

loading image