esakal | Chiplun Flood Update:नागरिकांच्या सुरक्षेसाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज; पालकमंत्री परब
sakal

बोलून बातमी शोधा

नागरिकांच्या सुरक्षेसाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज; पालकमंत्री परब

एनडीआरएफच्या टीमचे दोन ग्रुप केले आहेत. बोटी, ट्यूब, दोरी आदीच्या माध्यमातून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.

नागरिकांच्या सुरक्षेसाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज; पालकमंत्री परब

sakal_logo
By
- राजेश शेळके

रत्नागिरी : कोळके धरणातील (Kolke Dam)पाण्याचा विसर्ग आणि अपेक्षेपेक्षा जास्त झालेल्या अतिवृष्टीमुळे चिपळूण, खेडसह (Chiplun,Khed)जिल्ह्यात ठिकठिकाणी पाणी भरले आहे. सर्व नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. चिपळूणमध्ये पुराच्या पाण्यात आडकलेल्या नागरिकांना तत्काळ बाहेर काढून सुरक्षित ठिकणी हलविण्यावर भर आहे. त्यासाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज आहे. एनडीआरएफच्या टीमचे दोन ग्रुप केले आहेत. बोटी, ट्यूब, दोरी आदीच्या माध्यमातून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून हेलिकॉप्टरची तयार ठेवली आहे. बाधितांना आधार देऊन तत्काळ मदत मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती पालकमंत्री अॅड. अनिल परब (Guardian Minister Anil Parab) यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग, जिल्हा परिषदेच्या कार्यकारी मुख्याधिकारी इंदुरानी जाखड, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी भडकवाड आदी उपस्थित होते.(Guardian-Minister-Anil-Parab-visit-in-chiplun-flood-konkan-rain-2021-update-akb84)

हेही वाचा: Chiplun Flood 2021: चिपळूणध्ये रेस्क्यू टीम दाखल

परब म्हणाले, जिल्ह्यातील अतिवृष्टीचा आज आढावा घेलता. बाधितांना तत्काळ मदत मिळावी यासाठी आपत्कालीन व्यवस्था दोन दिवसांपासून सतर्क ठेवली आहे. अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस पडल्याने आज चिपळूण, खेडमध्ये पूर स्थिती आहे. त्यात कोळकेवाडी धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. धरण पसरिसरामध्ये पाऊस होत असल्याने जोवर तो पाऊस थांबत नाही, तोवर हा विसर्ग सुरू ठेवण्यात येणार आहेत. तरच धरणाची सूरक्षित पातळी राहणार आहे. त्यासाठी धऱणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे चिपळूणमधील पूर स्थिती कायम आहे. मदत कार्य तत्काळ सुरू केले आहे. त्यासाठी ४ खासगी बोटी, पोलिसांची १, कोस्टगार्डची १, कस्टमची १, पालिकेची अशा ७ बोटी तयार आहेत. पोहण्यात तरबेज असलेले व इतर सामाजिक संस्था आदींची यादी तयार आहे. त्यांच्याशी संपर्क साधून मदत कार्य सुरू केले आहे. एनडीआरएफच्या पथकाचे २३ जणांचे २ ग्रुप तयार करून मदत कार्य सुरू आहे. खेडला देखील मदत कार्य सुरू केले आहे. रेस्क्यु केलेल्या नागरिकांना सावर्डेत सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहेत. त्यांना खाण्याची आणि राहण्याची व्यवस्था केली आहे. मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा केली असून गरज भासल्यास हेलिकॉप्टरची तयार ठेवले आहे.

चक्रीवादळ निवारा केंद्रा उभारण्यावर भर: परब

कोकणावर गेल्या काही वर्षांपासून वारंवार नैसर्गिक आपत्ती येताना दिसत आहेत. फियान, निसर्ग, तौत्के या वादलांमुळे जिल्ह्यात नागरिकांच्या सुरक्षेसाठी चक्रीवादळ निवारा केंद्रा (सेल्टर) उभारण्याची आता काळाची गरज आहे. यापूर्वी केंद्राचे गेलेले प्रस्ताव अजूनही रखडले आहेत. ते का रखडले आहे, त्यामध्ये काय त्रुटी आहेत. याबाबत माहिती घेऊन तत्काळ ही केंद्र उभारण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न आहेत, असेही अॅड. परब यांनी सांगितले.

loading image