भरतीच्या वेळेत ढगफुटी झाली तरच चिपळूणला महापुर

कोळकेवाडी धरणातून पाणी सोडल्यानंतर अवजल कालवा असा तुडूंब भरून वाहत होता
kokan
kokansakal

चिपळूण : कोळकेवाडी धरणातून वाशिष्ठी नदीत सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे आज परिक्षण करण्यात आले. अरबी समुद्राला भरती नसताना वाशिष्ठी नदीतील पाण्याची पातळी सरसरी 1 मीटर तर भरतीच्या काळात 3.01 मीटरने वाढली. सध्या पावसाचे प्रमाण फारच कमी आहे. वाशिष्ठीतील गाळ काढलेला आहे. त्यामुळे भरतीच्या वेळेत ढगफुटी झाली तरच चिपळूणला महापुराचा धोका होऊ शकतो असा प्राथमीक अंदाज बांधला जात आहे. १२ जुलै रोजी होणाऱ्या अभ्यास गटाच्या बैठकीत अंतिम निष्कर्ष काढला जाणार आहे.

कोयना प्रकल्पात वीज निर्मिती झाल्यानंतरचे पाणी कोळकोवाडी धरणात सोडले जाते. कोळकेवाडी धरणाच्या पायथ्याशी असलेल्या चार संचामध्ये वीज निर्मिती करून हे पाणी कालव्याद्वारे थेट वाशिष्ठी नदीत सोडले जाते. या पाण्यामुळे चिपळूण शहरात पूर परिस्थिती निर्माण होते अशी ओरड केली जाते. त्याचा अभ्यास करण्यासाठी शासनाने एक समिती नेमली आहे. या समितीने आज कोळकेवाडी धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे वाशिष्ठी नदीतील पाण्याची पातळी किती वाढते याचे परिक्षण केले.

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार अतिवृष्टी तसेच हायटाईड असल्याने हा दिवस निवडण्यात आला. सकाळी 7 ते 9 या दरम्यान कोयनेची वीज बंद होती. 9 वाजता वीज निर्मिती सुरू झाल्यानंतर अवजल कालव्यातून चिपळूणकडे पाणी दुपारी साडेबारा वाजता पोहचले. म्हणजेच कोयनेचे अवजल चिपळूणपर्यंत येण्यासाठी पावणे दोन तासाचा कालावधी लागला. या कालावधीत दर सेकंदराला पाण्याचा असलेला वेगही मोजण्यात आला. सरासरी साडेआठ हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू होता. या पाण्यामुळे भरती नसताना वाशिष्ठी नदीतील पाण्याची पातळी सरासरी एक मीटरने वाढली. तसेच भरतीच्या कालावधीत सरासरी 3.01 मीटरने वाढली.

कोयनेचे अवजल पात्रात सोडण्यापूर्वीपासून म्हणजेच पहाटे ६ वाजल्यापासून पाटबंधारे खात्यामार्फत या नोंदी घेतल्या जात होत्या. पाणी सोडण्याआधीची स्थिती व पाणी सोडल्यानंतरची स्थिती याची आकडेवारी घेण्यात आली आहे. पिंपळी, खेर्डी, बहादूरशेख, वालोपे, मुरादपूर, पेठमाप, गोवळकोट, एन्टरॉन पूल तसेच बाजार पूल आदी ठिकाणी वाशिष्ठीच्या पाणी पातळीच्या नोंदी घेण्यात आल्या. यासाठी महाजनकोचे महाव्यवस्थापक चोपडा, सहाय्यक व्यवस्थापक कुंभार, कोळकेवाडी धरण व्यवस्थापनचे मुख्य अभियंता नितेश पोतदार, सीडब्ल्यूपीआरएसचे शास्त्रज्ञ डॉ. कुंजीर, कोळकेवाडी धरणाचे उपविभागीय अभियंता डी. डी. गायकवाड, अभ्यास गट समितीचे संजीव अणेराव, सतीश कदम, मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, प्रशासकीय अधिकारी अनंत मोरे, प्रमोद ठसाळे व अन्य अधिकारी वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देत होते.

आज पुन्हा परिक्षण

गूरूवारी दुपारी ३ वाजेपर्यंत या नोंदी घेण्यात आल्या. शुक्रवारी पुन्हा परिक्षण घेतले जाणार आहेत. त्यसाठी बहादूरशेख येथे तर वॉटर गेज मशिन बसविण्यात आली आहे. ही सर्व माहिती एकत्रित करून सांख्यिकी पद्धतीने मांडण्यात येणार आहे व त्यातून येणारे अनुमान अभ्यास गट समितीला देण्यात येणार आहे. यानंतर अभ्यास गटाच्या पुढील बैठकीत या बाबत अंतिम विचारविनिमय होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com