Chiplun flyover Buddhistwadi connecting road work
esakal
चिपळूण : शहरातील बहुप्रतिक्षित उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्याच्या हालचालींना प्रचंड वेग आला (Chiplun flyover opening before Ganeshotsav) आहे. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उड्डाणपुलाची एक मार्गिका सुरू करण्याच्यादृष्टीने बौद्धवाडी येथील जोडरस्त्याच्या माती भरावाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हे काम पुढील आठ दिवसांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महामार्ग विभागाने ठेवले आहे. त्यामुळे अठरा वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या या उड्डाणपुलावरून चाकरमान्यांचा प्रवास सुरू होण्याचा मार्ग मोकळा होत आहे.