esakal | भूगर्भशास्त्रज्ञांकडून नऊ वाड्यांची पाहणी
sakal

बोलून बातमी शोधा

chiplun

Chiplun : भूगर्भशास्त्रज्ञांकडून नऊ वाड्यांची पाहणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चिपळूण : कोळकेवाडी येथे झालेल्या अतिवृष्टीत अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या. काही ठिकाणी जमिनीला भेगाही पडल्या. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले होते. येथील भागाची भूगर्भशास्त्रज्ञांनी पाहणी केली असून, त्याचा अहवाल शासनाला दिला आहे. विशेषतः धरणाच्या उजव्या तीरावर वसलेली बोलाडवाडी, बौद्धवाडी व डाव्या तीरावर वसलेली तांबडवाडी, हसरेवाडी या चार वाड्या बाधित झाल्या होत्या. तसेच, खरवाज धनगरवाडी, जांभरई धनगरवाडी, कौलवणे, माच, वाडसाडी या वाड्यांमध्येही मोठमोठ्या भेगा गेल्या होत्या.

कोळकेवाडीत मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी दरड कोसळून मातीचा भराव खाली आला. परिणामी स्थानिक नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती. याबाबत कोळकेवाडी ग्रामपंचायतीने प्रांताधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना सविस्तर पत्राद्वारे माहिती कळविण्यात आली होती.

त्यानंतर दुसऱ्याच दिवशी प्रांताधिकारी यांनी कोळकेवाडी गावाला भेट दिली व भूगर्भशास्त्रज्ञांनी सर्व परिसराची पाहणी केली. पाहणीचा अहवाल आल्यावर त्यानुसार कार्यवाही करण्याची हमी दिली होती. त्यानंतर भूगर्भशास्त्रज्ञ कुलकर्णी, प्राध्यापक डॉ. राजे, राजन इंदुलकर व त्यांच्या सहकाऱ्यांच्या साहाय्याने या भागाचा खासगी अभ्यास दौरा करण्यात आला. त्यांनी पाहणीचा अहवाल शासनाला सादर केला आहे.

हेही वाचा: Good News: गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांसाठी RTPCR चे बंधन नाही

भूगर्भशास्त्रज्ञांकडूनही पाहणी; नोंदवली निरीक्षणे

शासकीय भूगर्भशास्त्रज्ञ २ व ३ सप्टेंबरला कोळकेवाडी येथे पाहणी करण्यासाठी आले होते. त्यांनी खरवाज, हसरेवाडी, तांबडवाडी जांभरई, कौलवणे, माच, वाडसाडी, बौद्धवाडी आणि बोलाडवाडी येथे पाहणी केली व निरीक्षणे नोंदवली. त्याचा अहवाल शासनाला सादर करून योग्य ती अंमलबजावणी करण्यासंदर्भात सूचना केल्या आहेत. या वेळी त्यांच्याबरोबर सरपंच पल्लवी शिंदे, उपसरपंच सचिन मोहिते, ग्रामपंचायत सदस्य रमेश बंगाल व सुरेखा बोलाडे, मंडळ अधिकारी आयरे, कदम, ग्रामविकास अधिकारी मंगेश पिंगळे, तलाठी भाग्यवंत, पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

हा भाग जर राहण्यासाठी धोकादायक ठरत असेल तर शासनाने या भागात योग्य त्या उपाययोजना कराव्यात किंवा येथील लोकांचे अलोरे येथील शासकीय जागेत पुनर्वसन करावे.

- सचिन मोहिते, उपसरपंच

loading image
go to top