Savatsada Waterfall Update : पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! अखेर परशुराम घाटातील प्रसिद्ध 'सवतसडा धबधबा' प्रवाहित; पाहा मनमोहक दृश्य, चिपळुणात धुवांधार

Ratnagiri rain yellow alert : चिपळूणमध्ये मुसळधार पावसामुळे परशुराम घाटातील सवतसडा धबधबा पुन्हा प्रवाहित झाला. मुंबई-गोवा महामार्गावरील हे निसर्गरम्य ठिकाण पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे.
Heavy rainfall in Konkan today

Heavy rainfall in Konkan today

esakal

Updated on: 

चिपळूण/रत्नागिरी : चिपळूण शहर आणि परिसरात रविवारी दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली. अवघ्या दोन ते अडीच तासांत कोसळलेल्या या पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात असलेला ‘सवतसडा धबधबा’ अखेर (Savatsada Waterfall latest update) प्रवाहित झाला. मात्र, ता लुक्याचा उर्वरित भाग आणि रत्नागिरी शहरात दिवसभर पावसाची नोंद झालेली नाही. हवामान विभागाने पुढील तीन दिवस रत्नागिरी जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com