esakal | Chiplun: कुंभार्ली घाटात दरड कोसळली
sakal

बोलून बातमी शोधा

घाटात दरड कोसळली

चिपळूण : कुंभार्ली घाटात दरड कोसळली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चिपळूण : गेले 4 दिवस सातत्याने पडणाऱ्या पावसाने आज पोफळी -शिरगाव भागाला झोडपून काढले. शिरगावमध्ये वाशिष्ठीला पूर आला.पावसाच्या रौद्र रूपाने या परिसराला धडकी भरली. शिरगाव व पोफळी परिसरात ढगफुटी होऊन शिरगावात वाशिष्टी नदी कोपली तर कुंभार्ली घाटात दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली. मात्र तत्काळ जेसीबीच्या साहयाने दरड बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

शिरगाव पोफळी परिसरात रविवारी सायंकाळी 5 .30 वा दरम्यान पावसाने जोरदार तडाखा दिला.घाटातील डोंगर दऱ्यात मुसळधार पाऊस पडल्यामुळे शिरगावच्या वाशिष्टी नदीला काही वेळातच पूरपरिस्थिती निर्माण झाली एवढा पावसाचा जोर भयानक अन भितीदायक होता असे घाटातून खाली आलेल्यानी सांगितले.

हेही वाचा: मुंबई : ऑक्सिजन प्लांट उभारणीच्या कामाला वेग

कुंभार्ली घाटातील एका वळणावर दरड कोसळल्यामुळे घाटातील काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. शिरगावात वाशिष्टी नदीने रूद्र रूप धारण केले त्यामुळे निर्माण झालेल्या पुरजन्य परिस्थितीमुळे तात्काळ शिरगाव पोलीस यांनी शिरगावच्या वाशिष्टी पुलावरील वाहतूक बंद केली .कुंभार्ली घाटात दरड कोसळल्यामुळे ठप्प झालेली वाहतूक पोलीस व ग्रामस्थांनी जेसीबीच्या साहयाने दरड बाजूला करून सुरळीत करण्यात आली.

यामुळे घाटात अडकलेल्याना दिलासा मिळाला. शिरगाव वासीयांनी रात्रभर जीव मुठीत घेऊन काढला. पोफळी आणि शिरगावमध्ये नदी किनारी असलेल्या घरापर्यंत वाशिष्ठी नदीचे पाणी गेले. पावसाच्या पाण्याने भातशेतीचेही नुकसान केले. विजांचा गडगडात रात्रभर सुरू होता त्यामुळे काही भागाचा रात्रभर वीजपुरवठा खंडित होता.

loading image
go to top