esakal | Mumbai: ऑक्सिजन प्लांट उभारणीच्या कामाला वेग
sakal

बोलून बातमी शोधा

ऑक्सिजन प्लांट

मुंबई : ऑक्सिजन प्लांट उभारणीच्या कामाला वेग

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल येथील जगजीवन राम रुग्णालयात दोन ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येत आहे. या दोन प्लांटमधून दर एका मिनिटाला एकूण एक हजार लीटर ऑक्सिजनचा पुरवठा केला जाणार आहे. यामुळे दरदिवशी 200 रुग्णांना ऑक्सिजनची गरज भागविता येईल. हे दोन्ही प्लांट ऑक्टोबर अखेरीस पूर्ण होण्याची शक्यता आहे. सध्या ऑक्सिजन टाक्याची उभारणी करून जोडणी करण्याचे काम सुरू आहे.

कोरोना काळात ऑक्सिजनचा अभाव भासू लागला होता. परिणामी, रो-रो सेवेने देशभरात द्रवरूप ऑक्सिजनचा पुरवठा केला गेला. येत्या काळात ऑक्सिजनची कमतरता भासू नये, यासाठी संपूर्ण पश्चिम रेल्वे प्रत्येक विभागात 5.60 कोटी रुपये खर्च करून सात रुग्णालयात ऑक्सिजन प्लांटची उभारले जाणार आहेत. पश्चिम रेल्वे झोनमधील मुंबई सेंट्रल, अहमदाबाद, रतलाम, राजकोट, भावनगर, बडोदा या विभागातील रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट उभे करण्याची येत आहेत. पश्चिम रेल्वेच्या मुंबईतील जनजीवन राम रुग्णालयात 1 कोटी 12 लाखांचा खर्च करून दोन ऑक्सिजन प्लांट उभे केले जात आहे. यातून दर मिनिटाला एक हजार लीटर ऑक्सिजनची निर्मिती केली जाईल.

हेही वाचा: मुंबईत ब्रेक थ्रूचा संसर्ग कमी

सध्या जगजीवन राम रुग्णालयात ऑक्सिजन प्लांटच्या छताचे काम सुरु आहे. चारही बाजूने सुरक्षा जाळी बसविली जात आहे. तर, ऑक्सिजन टाक्यांची अंतर्गत जोडणी सुरू आहे. ऑक्टोबर अखेरीस हे दोन प्लांट पूर्ण होणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माहिती दिली.

पश्चिम रेल्वेच्या अहमदाबाद येथे 1 कोटी 28 लाखांचा खर्च करून यातून मिनिटाला 500 लीटर ऑक्सिजनची निर्मिती केली जाणार आहे. बडोदा येथे 90 लाख खर्च करून यातून मिनिटाला 500 लीटर ऑक्सिजनची निर्मिती केली जाणार आहे. रतलाम येथे 85.85 लाख रुपये खर्च करून मिनिटाला 500 लीटर ऑक्सिजनची निर्मिती केली जाणार आहे. रतलाम येथील दाहोदमध्ये 20 लाख रुपये खर्च करून यातून मिनिटाला 500 लीटर ऑक्सिजनची निर्मिती केली जाणार आहे. भावनगर येथे 53.76 लाख खर्च करून मिनिटाला 500 लीटर ऑक्सिजनची निर्मिती केली जाणार आहे. राजकोट येथे 69.82 लाख खर्च करून यातून मिनिटाला 500 लीटर ऑक्सिजनची निर्मिती केली जाणार आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

loading image
go to top