Chiplun Municipal Election
esakal
चिपळूण : चिपळूण पालिकेच्या निवडणुकीत (Chiplun Municipal Election) नगराध्यक्षपदासाठी ठाकरे गटाचा उमेदवार उभा असताना या पक्षाचे नेते आमदार भास्कर जाधव हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवाराचा प्रचार करणार आहेत. आमदार जाधव आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्यातील विसंवादामुळे चिपळूणमध्ये शिवसेनेत उभी फूट पडल्याचे पाहायला मिळत आहे.