चिपळूण: विधानसभेचा आखाडा पार पडला असून, विजयाचा गुलालही उडाला आहे. त्यामुळे आता दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांकडे आता सर्व कार्यकर्त्यांचे लक्ष लागलेले आहे. .Ahilyanagar Heat and Run : ‘हीट ॲण्ड रन’मध्ये एक ठार, दोघे गंभीर.सध्या महाविकास आघाडीला यश मिळाले नसले तरीही मतांची टक्केवारी राखली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी चिपळूण पालिका ताब्यात मिळवण्यासाठी प्रयत्न करणार, हे निश्चित आहे. माजी आमदार रमेश कदम, गुहागरचे आमदार भास्कर जाधव आणि राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कदम, क्षेत्रप्रमुख बाळा कदम या सर्वांचे मनोमिलन झाले तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून चिपळूण पालिका ताब्यात घेण्याची संधी आहे..चिपळुणात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये दोन शिवसेना आणि दोन राष्ट्रवादीमध्ये प्रमुख लढत होईल. शहरांमध्ये काँग्रेस आणि भाजप उमेदवारांची संख्या वाढेल, असे चित्र आहे. आता सहा राजकीय पक्ष असल्यामुळे आघाडी, युती झाली नाही तर इच्छुकांना पर्याय वाढलेले आहेत. ग्रामीण भागाचे राजकारण विद्यमान आमदार शेखर निकम, माजी आमदार रमेश कदम, सदानंद चव्हाण आणि गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्या भोवती फिरते. शेखर निकम आणि सदानंद चव्हाण महायुतीच्या माध्यमातून एकत्र राहिले तर महाविकास आघाडीवर किती परिणाम होईल, हे येणाऱ्या काळात कळेल..विधानसभेचा निकाल पाहता नऊ जिल्हा परिषद गटांपैकी सात गटांवर अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांच्यामध्ये मोठी चुरस पाहायला मिळाली. आगामी काळात यामध्ये दोन शिवसेनेच्या उमेदवारांची एंट्री होणार आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्वच पक्षांसाठी आव्हानात्मक असतील. विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शेखर निकम आणि शरद पवार गटाचे प्रशांत यादव यांच्यामध्ये चुरशीची लढत झाली. त्यामध्ये निकम विजयी झाले. त्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. या विजयामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपचाही वाटा आहे. प्रशांत यादव यांना मिळालेल्या मतांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा सहभाग आहे. हे पाच पक्ष जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये जागावाटपात महायुती आणि आघाडीकडे दावे करतील..Ratnagiri Assembly Election Result : मालगुंडमध्ये मतदारांनी दिली महायुतीला पसंती.स्थानिक स्वराज्य संस्थांवर जे प्रशासक नेमलेले आहेत त्यांच्यावर कामाचा दबाव वाढल्यामुळे शहराचा आणि ग्रामीण भागाचा विकास खुंटला आहे. सर्वसामान्य लोकांची कामे होत नाहीत. सामान्य लोक आमच्याकडे येतात आम्ही त्यांना दिलासा देण्यापलीकडे काहीच करू शकत नाही. त्यामुळे निवडणुका या लवकर होणे गरजेचे आहे.- शशिकांत मोदी,शहरप्रमुख शिवसेना ठाकरे गट.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.