सफाई कामगार ठरले खरे कोरोना योद्धे : चिपळूणात चौघांवर अंत्यसंस्कार

मुझफ्फर खान
Friday, 24 July 2020

चिपळूणात चौघांवर पालिका कर्मचार्‍यांकडून अंत्यसंस्कार ; प्रकाशझोतात नसताना अमूल्य योगदान 

चिपळूण (रत्नागिरी) :  कोरोनाच्या युद्धात डॉक्टर, पोलीस यांचे योगदान महत्वाचे आहेच, पण प्रकाशझोतात न येताच अंत्यविधी पार पाडणार्‍या पालिका कर्मचार्‍यांचे योगदानही तेवढेच अमूल्य आहे. आतापर्यंत 2 कोरोना पॉझिटीव्ह आणि दोन संशयित अशा चौघांवर पालिकेच्या कर्मचार्‍यांनी अंत्यसंस्कार केला. 

कोरोनाग्रस्त रूग्णांना बरे करण्यासाठी आरोग्य विभागातील सर्वच अधिकारी आणि कर्मचारी प्रयत्न करीत आहेत. मात्र अन्य आजार असलेल्या रूग्णांना धोका अधिक असतो. उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर काही नातेवाईक रूग्णालयाकडे फिरकतसुध्दा नाहीत. काही प्रशासकीय कार्यवाहीसाठीही उपस्थित राहण्यास नकार येतो. कोरानाने मृत्यू झालेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी दोन व्यक्तींनी पीपीई कीट घालून उपिस्थित राहाण्यास परवानगी असते. त्यासाठी पीपीई कीट रूग्णालयाकडून पुरवले जाते मात्र तरीदेखील काही नातेवाईक भीतीमुळे जात नाहीत.

हेही वाचा- कोव्हिड योद्धाचा निर्णय :  या बालरोगतज्ञांनी प्रशासनाला दिले पत्र..का वाचा... -

मृत्यूनंतरच्या कायदेशीर सोपस्कारचे पत्रही काहीजण प्रत्यक्ष न देता व्हॉटसअप, मेलवर पाठवतात. इतकी कोरोनाची दहशत असताना आपला जीव धोक्यात घालून पालिका कर्मचार्‍यांकडून मृतांवर होणारे अंत्यसंस्कार हे कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे.
जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या फैलावाबरोबरच मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. आजपर्यंत तालुक्यात 9 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून बहुतांश जणांनी रत्नागिरी जिल्हा कोव्हीड रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे.

हेही वाचा- मिटुनी लोचने गाणारा दीप जोशी ठरला पहिला आयडॉल : ३८ जणांनी घेतला होता सहभाग... -

शासकीय निर्देशानुसार सुरक्षीततेचा भाग म्हणून जेथे मृत्यू झाला तेथून नजीकच्या स्मशानभूमीत त्यावर अंत्यसंस्कार करणे अपेक्षीत आहे. त्यामुळे कामथे उपजिल्हा रूग्णालयात ज्यांचा मृत्यु झाला अशांचे मृतदेह पालिकेच्या ताब्यात देण्यात आले. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी पालिका कर्मचार्‍यांनी पार पाडली. आतापर्यंत वांगडे मोहल्ला येथील 1, बावशेवाडी 1, पेढांबे एक आणि खेडमधील एका महिलेवर चिपळूण पालिका कर्मचार्‍यांनी अंत्यसंस्कार केले. 

हेही वाचा- ब्रेकिंग : शासकीय रुग्णालयात काम करणारे भूलतज्ञ झाले कोरोना बाधित.... -

कोरोनाग्रस्तांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी पथक तयार केले आहे. यामध्ये गटविकास अधिकारी सौ. सरिता पवरा, निवासी नायब तहसिलदार तानाजी शेजाळ, पालिकेतील प्रशासकीय अधिकारी प्रमोद ठसाळे, अनंत मोरे, आरोग्य निरिक्षक वैभव निवाते आदी सदस्य आहेत. पालिकेच्या आरोग्य विभागाचे 8 कर्मचारी अंत्यसंस्कार करतात. मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना कर्मचारी स्वत:च्या सुरक्षेसाठी लागणारे पीपीई कीट परिधान करतात. निर्जतुकीकरण केल्यानंतरच ते कुटुंबात जातात.

संपादन - अर्चना बनगे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chiplun Municipality good workers good work 4 corona patient Funeral