
चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात चौपदरीकरणाचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे; मात्र निकृष्ट कामामुळे घाटात अपघातांची मालिका सुरू आहे. त्यामुळे परशुराम घाटाला पर्यायी मार्ग असणे आवश्यक बनले आहे. धामणेदवीमार्गे पेढे असा मार्ग अस्तित्वात येणे सहजशक्य आहे. सध्या राष्ट्रीय महामार्ग विभागाने परशुराम घाटात कोकण रेल्वेच्या धर्तीवर दरडी कोसळू नयेत म्हणून लोखंडी जाळी आणि अन्य सुरक्षित उपाययोजना करण्यासाठी पावले उचलली आहेत.