

Chiplun 17 Year Old Student Dies at Hospital Family Loses Only Support as Police Begin Probe Into Sudden Death
sakal
चिपळूण : तालुक्यातील वहाळ घडशीवाडी येथील साहिल सुरेश भागडे (वय १७) या बारावीच्या विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली. गुरुवारी १ रोजी रात्री ८ वाजता ही घटना घडली. साहिल एका खासगी रुग्णालयात रुग्णाची नोंद करण्यासाठी गेला होता. तेथेच त्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली.