esakal | सिंधुदुर्ग : चिपी विमानतळ उद्घाटन कार्यक्रम लपून छपून का ? भाजप
sakal

बोलून बातमी शोधा

विमान

सिंधुदुर्ग : चिपी विमानतळ उद्घाटन कार्यक्रम लपून छपून का ? भाजप

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेने वर्षानुवर्षे वाट पाहिली त्या चिपी विमानतळाच्या उद्घाटनासाठी दोन केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री व राज्याचे मंत्रिमंडळ उपस्थित राहत असताना मोजक्याच लोकांना बोलावून कार्यक्रम लपून छपून का असा सवाल भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी उपस्थित केला. जिल्हाधिकारी यांनी हा कार्यक्रम खुला घ्यावा, अशी विनंतीही भाजपाच्या माध्यमातून करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

येथील पालिकेच्या लोकमान्य टिळक सभागृहात तेली यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासोबत नगराध्यक्ष संजू परब, नगरसेवक मनोज नाईक उपस्थित होते. श्री. तेली म्हणाले, ``केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्यात उद्योगमंत्री असताना एमआयडीसीच्या माध्यमातून या चिपी विमानतळाची मुहूर्तमेढ रोवली.

हेही वाचा: पुणे : महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन कागदावरच पावसाळ्यात नागरिक हैराण

त्या काळीच विमानतळाचे महत्त्वाचे काम पूर्ण झाले होते. त्यानंतर तत्कालीन केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उर्वरित काम व परवानग्या मिळवून दिल्या होत्या. आता राणे केंद्रात मंत्री झाल्यानंतर विमानाच्या उड्डाणासाठी लागणारी परवानगी त्यांनी मिळवून दिली. असे असताना विमानतळाच्या श्रेयासाठी धडपडत असणारे सत्ताधारी मात्र परिसरातील साधा रस्ताही सुध्दा करू शकले नाहीत. त्याठिकाणी आवश्यक असलेली पाण्याची व्यवस्था तसेच ३३ केव्ही वीजेची व्यवस्था यांना करता आली नाही. आता उद्घाटनच्या पार्श्वभूमीवर त्याठिकाणी खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे हे दुर्दैव आहे.

जिल्ह्यातील जनतेच्या नजरेत चिपी विमानतळ उद्घाटन हे एक प्रकारे आनंदोत्सवच आहे; मात्र ज्या शेतकऱ्याने आपल्या जमिनी या विमानतळासाठी दिल्या त्यांना तसेच पंचक्रोशीतील सरपंचांना आमंत्रित करण्यात आले नाही. निमंत्रण पत्रिकेवर साध नाव सुद्धा टाकले नाही. दडून उद्घाटन करण्यापेक्षा ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं सर्वांना सामावून घेऊन हा कार्यक्रम करणे गरजेचे होते; मात्र तसे न करता मोजक्याच लोकांना घेऊन कार्यक्रम करणे चुकीचे आहे. जिल्ह्यातील जनतेने या कार्यक्रमासाठी वाजत गाजत यावं कार्यक्रम संपल्यानंतर नारायण राणे जनतेची भेट घेणार असून ते जनतेची निवेदने स्वीकारणार आहेत.``

ते पुढे म्हणाले, ``जिल्ह्यातील महत्वाकांशी असलेला सी-वर्ल्ड प्रकल्प झाल्यास तसेच तर कर्ली नदीच्या पात्रातून बोटीद्वारे जलप्रवास सुरू केल्यास देश-विदेशातील पर्यटक सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होऊन चिपी विमानतळावर १० विमाने सुद्धा कमी पडतील. त्यामुळे या दोन्ही गोष्टीसाठी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

हेही वाचा: सीएम सपत्नीक घेतल मुंबादेवीचं दर्शन, ; पाहा व्हिडिओ

या विमानतळाची संबंधित काही टेंडर लोकप्रतिनिधींशी संबंधित लोकांना देण्यात येत असल्याचे आढळून आले आहे; मात्र असे न होता ती टेंडर स्थानिक लोकांना मिळणे गरजेचे आहे. सुरवातीला तसे आश्वासन स्थानिकांना देण्यात आली होती ती आश्वासने प्रशासनाने पाळणे गरजेचे आहे. विमानतळावरही स्थानिकांना नोकरीमध्ये सामावून घेणे आवश्यक असून त्यासाठी भारतीय जनता पक्ष स्थानिकांच्या पूर्णपणे पाठीशी राहील. स्थानिकांना न्याय मिळवून देण्यासाठी वेळ पडल्यास आंदोलनासारखा मार्ग स्वीकारला जाईल.

कोरोनाचे कारण पुढे करत जनतेला डावलून होत असलेला चिपी विमानतळाच्या उद्घाटनाचा बंदिस्त कार्यक्रम म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हावासियांचे दुर्दैव आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा लाखोंच्या उपस्थितीत होणार आहेत. मंदिरे, शाळा सर्व खुले झाले आहे. असे असताना ज्या सिंधुदुर्गवासियांनी वर्षानुवर्षे या विमानतळाचे स्वप्न पाहिले तसेच ज्या लोकांनी विमानतळासाठी जागा दिल्या त्यांना डावलले हे दुर्दैवी आहे. त्यामूळे जिल्हावासियांनी वाजत गाजत या कार्यक्रमासाठी यावे. प्रशासनानेही सन्मानाने जनतेला कार्यक्रमात सहभागी करून घ्यावे. कार्यक्रम संपल्यानंतर केंद्रीय मंत्री राणे उपस्थित जनतेची भेट घेणार आहेत.

हेही वाचा: 6 महिने ते 5 वर्षे वयोगटासाठी फायजरच्या लसीची ट्रायल सुरु

``विमानतळावर पक्षाच्या बैठका जिल्ह्यातील शिवसेनेच्या नेत्यांकडून चिपी विमानतळावर पक्षाच्या शाखेप्रमाणे राजकीय बैठका घेतल्या जात आहेत. त्या ठिकाणी विमानतळाबाबत सत्ताधाऱ्यांनी राजकारण करू नये. विकासाच्या कामात भाजपकडून कुठलीही अडचण केली जाणार नाही. याठिकाणी स्थानिकांना प्राधान्य देण्यावर भर असला पाहिजे, असेही तेली यांनी सांगितले

loading image
go to top