पुणे : महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन कागदावरच पावसाळ्यात नागरिक हैराण

स्मार्ट सिटी अशी ओळख असलेल्या शहरातील आपत्ती व्यवस्थापन विभाग कागदावरच
सहकारनगर:तुळशीबागवाले कॉलनी दशभुजा गणपती मार्गावरील रस्त्यावर झाडांच्या फांद्या पडून आणि वाहत आहेत तर रस्त्यावरील चेंबर तुंबले आहेत रस्ते जलमय होत आहेत.
सहकारनगर:तुळशीबागवाले कॉलनी दशभुजा गणपती मार्गावरील रस्त्यावर झाडांच्या फांद्या पडून आणि वाहत आहेत तर रस्त्यावरील चेंबर तुंबले आहेत रस्ते जलमय होत आहेत.sakal

पुणे : स्मार्ट सिटी अशी ओळख असलेल्या शहरातील आपत्ती व्यवस्थापन विभाग कागदावरच असल्याचे चित्र दोन दिवसांपासून सायंकाळच्या वेळी पडत असलेल्या पावसात चित्र दिसत आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस उपाय योजना राबवण्यात हा विभाग फोल ठरत आहे. चोवीस तास कार्यरत असलेला हा आपत्ती व्यवस्थापन विभाग नक्की काय करतो? असा प्रश्‍न सहकारनगर - पद्मावती भागातील नागरिक करीत आहेत.

शहरात सोमवार पासून  दुपारनंतर गेले दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे आणि पुणे शहरात सर्वत्र रस्त्यावर पाणीच पाणी साचून रस्ते जलमय झाले आहेत. त्यामध्ये स्वारगेट,सहकारनगर,पर्वती, पद्मावती, सातारा रस्ता,धनकवडी  या भागात सर्वत्र पाणीच पाणी दिसून येत आहे. पावसाळ्यापूर्वी करण्यात येणारी सांडपाणी लाईन ,चेंबर दुरुस्ती ही कामे झालीच नसल्यामुळे रस्त्यावर पाणीच पाणी दिसत आहे. यावर आपत्ती व्यवस्थापन विभागाचा दावा फोल ठरत आहे.

सहकारनगर:तुळशीबागवाले कॉलनी दशभुजा गणपती मार्गावरील रस्त्यावर झाडांच्या फांद्या पडून आणि वाहत आहेत तर रस्त्यावरील चेंबर तुंबले आहेत रस्ते जलमय होत आहेत.
Corona Update : पुण्यात दिवसभरात १८२ नवे कोरोना रुग्ण

मागील दोन वर्षांपूर्वी आंबिल ओढ्याला आलेल्या पुरात मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन जीवित आणि वित्तहानी ही मोठ्या प्रमाणात झाली होती. मात्र याचा धडा घेऊन सुद्धा आपत्ती व्यवस्थापने पावसाळयात होणाऱ्या संकटांकडे आपत्ती व्यवस्थापनाकडे लक्ष नसल्याचे दिसत आहे. गेले दोन दिवसापासून पडत असलेल्या पावसाने अहंकार करून सहकारनगर परिसरात झाडे ठीक ठिकाणी पडलेली आहेत.

हवामान विभागाने जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज दर्शविल्या नंतर आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून क्षेत्रीय कार्यालयांना यंत्रणा सुसज्ज ठेवण्याचे आदेश दिले जातात मात्र दोन दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसमुळे शहरातील मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचने, रस्त्यांवर पाणी येणे, रस्ते बंद होणे, झाडांच्या फांद्या पडणे,वीज पुरवठा खंडित होणे अशा बाबीं घडल्याचे चित्र दिसले. यामुळे वरील आराखडा कागदावरच राहिल्याचे चित्र गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसातून दिसत आहे.

सहकारनगर:तुळशीबागवाले कॉलनी दशभुजा गणपती मार्गावरील रस्त्यावर झाडांच्या फांद्या पडून आणि वाहत आहेत तर रस्त्यावरील चेंबर तुंबले आहेत रस्ते जलमय होत आहेत.
खड्ड्यांमुळे पालटले आमुचे नशीब...

त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन विभागाचा विकास आराखडा कागदावर दिसत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.यावेळी जयराज लांडगे म्हणाले, शहरातील व उपनगरातील नाल्यांची स्वच्छता ही योग्य प्रकारे झाली नसल्याने नाल्याचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याचे चित्र शहरात ठिकठिकाणी दिसले. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन विभागाने नक्की कोणती कामे केली हा प्रश्न सामान्य नागरिकांना पडत आहे. यामुळे आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कामाचे ऑडिट करणे गरजेचे आणि मनपाचे आपत्ती व्यवस्थापन सक्षम बनवण्याची गरज आहे. यावेळी प्रज्ञा पोतदार (सहकारनगर-धनकवडी सहाय्यक आयुक्त मनपा) म्हणाल्या, सहकारनगर भागातील अंतर्गत रस्त्यावर वादळी वाऱ्यामुळे रस्त्यावरील व सोसाट्याच्यामधील झाडे पडली आहेत.मनपाचे संबंधित कर्मचारी नुकसान झालेल्या परिसरात झाडांच्या फांद्या हटविण्याचे काम करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com