esakal | सावंतवाडी भाजपच्या 'या' अध्यक्षाने दिला आपल्या पदाचा राजीनामा....
sakal

बोलून बातमी शोधा

City Board President Resignation of office kokan marathi news

भाजपाच्या सावंतवाडी शहर मंडळ अध्यक्ष अॅड सिद्धार्थ भांबुरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

सावंतवाडी भाजपच्या 'या' अध्यक्षाने दिला आपल्या पदाचा राजीनामा....

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : भाजपाच्या सावंतवाडी शहर मंडळ अध्यक्ष अॅड सिद्धार्थ भांबुरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्याकडे सुपूर्त केला आहे. श्री भांबुरे यांनी तडकाफडकी दिलेल्या राजीनाम्यामुळे भाजपाच्या गोटात खळबळ उडाली आहे.

भाजपाने अलीकडेच पक्षात काही बदल करताना पक्षाचे काम तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक तालुक्यात तालुकाध्यक्षाची जबाबदारी वाटून देताना मंडळ निर्माण करण्यात आली होती. सावंतवाडी तालुक्याचा विस्तार लक्षात घेताच या ठिकाणी एकूण तीन मंडळे स्थापन करण्यात आले होते. त्यानुसार तीन तालुकाध्यक्ष निवडण्यात आले होते. यामध्ये सावंतवाडी शहर मंडळ अध्यक्षपदी अॅड सिद्धार्थ भांबुरे यांची निवड झाली होती.

हेही वाचा- `शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात सरकार राजकारण आणत आहे`  -

पक्षात उडाली खळबळ

एकूणच या निवडीनंतर पक्षाचे काम चांगल्या पद्धतीने सुरू असताना अचानक रविवारी श्री भांबुरे यांनी आपल्या पदाचा व पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने पक्षात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा-  पोस्टात पैसे जलद भरायचे आहेत मग हे ॲप डाऊनलोड करा....

कार्यकर्त्यांमधून अनेक तर्कवितर्क
श्री भांबुरे याने दिलेल्या राजीनाम्या मध्ये मला पक्षसंघटना करता आवश्यक वेळ देणे कठीण असल्याने व काही अपरिहार्य कारणास्तव पदाचा कार्यभार करणे शक्य नसल्याने आपण राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. श्री भांबुरे यांच्या राजीनाम्यामुळे कार्यकर्त्यांमधून अनेक तर्कवितर्क उपस्थित केले जात आहेत.

loading image
go to top