शिवमुद्रा प्रतिष्ठानकडून दुर्लक्षित मंदिराची साफसफाई 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 30 January 2020

शिवमुद्रा प्रतिष्ठानच्या पुष्कर शेट्ये, प्रणिल संसारे, दक्ष शेट्ये, तुषार बांडागळे, सागर नारकर, सुदेश नारकर, असिम बांडागळे यांच्यासह सदस्यांनी कसबा संगमेश्वर येथील कर्णेश्वर मंदिर व या परिसरातील दुर्लक्षित मंदिर परिसराची साफसफाई केली.

साडवली ( रत्नागिरी ) - देवरूखमधील शिवमुद्रा प्रतिष्ठानच्या 50 सदस्यांनी स्वच्छतेचा मंत्र जपत आपले अभियान सुरू केले आहे. मार्लेश्वर यात्रेत स्वच्छतेसाठी शिवमुद्रा ग्रुपने ठिकठिकाणी कचरा गोळा करण्यासाठी खोके ठेवून मार्लेश्वर देवस्थानला सहकार्य केले. ही मोहीम यशस्वी झाल्यावर प्रजासत्ताक दिनी कर्णेश्वर मंदिर परीसरातील मंदिरांची साफसफाई मोहीम राबवली. 

हेही वाचा - रत्नागिरीत काजू बागांवर फांदीमर 

शिवमुद्रा प्रतिष्ठानच्या पुष्कर शेट्ये, प्रणिल संसारे, दक्ष शेट्ये, तुषार बांडागळे, सागर नारकर, सुदेश नारकर, असिम बांडागळे यांच्यासह सदस्यांनी कसबा संगमेश्वर येथील कर्णेश्वर मंदिर व या परिसरातील दुर्लक्षित मंदिर परिसराची साफसफाई केली.

हेही वाचा - माजगावात माकडांच्या मृत्यूचे सत्र 

पावसाळ्यात वाढलेली झाडेझुडपे व वाढलेले गवत काढून टाकून मंदिर परीसर चकाचक केला. या भागात पुरातन अनेक मंदिरे आहेत. दगडी बांधकामांमुळे ही मंदिरे मजबूत आहेत. कोकण भागात पर्यटनाचा वाढता ओघ पाहता अशी ठिकाणे संरक्षित झाल्यास पर्यटक, भाविक कर्णेश्वर मंदिराप्रमाणेच या मंदिरातही येतील, असा विश्वास शिवमुद्रा सदस्यांनी व्यक्त केला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cleaning Of Temple By Shivmudra Foundation Ratnagiri Marathi News