भिमा -कोरेगावचा तपास केंद्राकडे देणार नाही - मुख्यमंत्री  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

cm uddhav thackeray comment on bhima koregaon case

भिमा-कोरेगाव प्रकरणाचा तपास केंद्राकडे देणार नाही, दलित बांधवांवर अन्याय होऊ देणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री ठाकरे यांनी घेतली आहे.

भिमा -कोरेगावचा तपास केंद्राकडे देणार नाही - मुख्यमंत्री 

सिंधुदुर्ग - भिमा-कोरेगाव प्रकरणाचा तपास केंद्राकडे देणार नाही, दलित बांधवांवर अन्याय होऊ देणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री ठाकरे यांनी घेतली आहे. दोन दिवसांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज सकाळी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आपली भूमिका झाहीर केली. 

हे पण वाचा - मी स्वप्न दाखवणार नाही पूर्ण करणार...

 मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी विविध विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले एल्गार परिषदेचा तपास केंद्राने काढून घेताल आहे. परंतु, भीमा-कोरेगाव प्रकरणाचा तपास केंद्राकडे जाऊ देणार नाही.  

हे पण वाचा - खुशखबर : आता मच्छीमारांचेही कर्ज होणार माफ...

यावेळी मुख्यमंत्र्यांनी सिंधुरत्नविकास योजना राबिविण्याची घोषणा केली. अडकलेली कामे मार्गी लावू असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. कोकणातील पर्यटन. कृषी, जलसिंचनसारखे प्रश्न तातडीने सोडविले जातील असेही मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले. सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासासाठी 'सिंधु-रत्न विकास योजना' जन्माला घातली आहे. या योजनेच्या माध्यमातून दोन्ही जिल्ह्यातील रखडलेला विकास व भविष्यात आवश्यक असलेल्या विकासाच्या योजना राबविल्या जातील, असे मुख्यमंत्री म्हणाले.