आता तारीख नाही लवकरच 'चिपी' सुरु: मुख्यमंत्र्यांची ग्वाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आता तारीख नाही लवकरच 'चिपी' सुरु: मुख्यमंत्र्यांची ग्वाही

आता तारीख नाही लवकरच 'चिपी' सुरु: मुख्यमंत्र्यांची ग्वाही

वेंगुर्ले (सिंधुदुर्ग): गेल्या वर्षीच्या निसर्ग चक्रीवादळापेक्षा (Nisar Cyclone)हे वादळ भयानक होते. या वादळाचा सिंधुदुर्गला (Sindhuurg)मोठा फटका बसला असून सुदैवाने एकही जीवितहानी झाली नाही. यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर नुकसानीचे पंचनामे पूर्ण करा. राज्याकडे कोणते प्रस्ताव आहेत. केंद्राकडे कोणते प्रस्ताव आहेत याची विभागणी करा. ही वादळं दरवर्षी येऊ शकतात यासाठी काही उपाययोजना कायमस्वरूपी करणे आवश्यक आहे. भूमिगत वीज वाहिन्या, धूप प्रतिबंधक बंधारा यासारखी कामे कायमस्वरूपी होणे आवश्यक असून त्यासाठी निधी देणार. कोकणाला निधी कमी पडू देणार नाही. असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपी येथे केले.

(CM-Uddhav-Thackray-Tauktae-Cyclone-Konkan-Visit-marathi-news)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची चिपी विमानतळ येथे मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठक संपन्न झाली यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी परिवहन मंत्री अनिल परब, खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार मिलिंद नार्वेकर, आमदार वैभव नाईक, आमदार दीपक केसरकर यांच्यासाहित विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोनाकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. अनेक रुग्ण दगावत आहेत. तिसरी लाट येऊ नये यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी. घरच्याघरी कशाप्रकारे उपचार करावेत याचीही आरोग्य यंत्रणेमार्फत घराघरात माहिती द्या. रुग्णसंख्या कमी होत असली तरी ऑक्सिजन क्षमता वाढवणे गरजेचे आहे. येत्या काळात हॉस्पिटलचे बेड वाढवणार असून आरोग्य यंत्रणेतील ज्या सुविधा देता येतील त्या देणार.

हेही वाचा- मुख्यमंत्री उध्दव ठाकरे रत्नागिरी -सिंधुदुर्ग दौर्‍यावरच का? विरोधी पक्ष नेत्यांचा सवाल

राज्यात १२ कोटी ऑक्सिजनची गरज असून जून महिन्यानंतर जास्तीत जास्त लसीचा पुरवठा होईल अशी माहिती दिली. यावेळी तौक्ते चक्रीवादळाच्या नुकसानीची जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली. प्रोजेक्टरद्वारे नुकसानीची छायाचित्रे दाखवून नुकसानीची माहिती देण्यात आली. यावेळी घरं, मांगर, झाडे पडून मोठे नुकसान झाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान किनारपट्टी भागात भूमिगत विद्युत वाहिन्या टाकणे गरजेचे असून किनारपट्टीवर धूप प्रतिबंधक बंधाऱ्यांची आवश्यकता असल्याची मागणी यावेळी खासदार विनायक राऊत यांनी केली. तसेच या वादळात अनेक रस्ते खराब झाल्याने रस्ते दुरुस्तीसाठी निधी आवश्यक असून हा निधी तात्काळ मिळावा अशी मागणी यावेळी आमदार वैभव नाईक यांनी केली. तर खारलँड मधूनही बंधारे होऊ शकतात त्यासाठी काही निकष बदलणे गरजेचे असल्याचेही यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

चिपी विमानतळ सुरू करण्याबाबत आता काही तारीख देणार नाही. विमानतळबाबत २५ मे रोजी संपूर्ण अहवाल येणार असून लवकरात लवकर विमानतळ सुरू करू असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

loading image
go to top