esakal | मुख्यमंत्री उध्दव ठाकरे रत्नागिरी -सिंधुदुर्ग दौर्‍यावरच का? विरोधी पक्ष नेत्यांचा सवाल
sakal

बोलून बातमी शोधा

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे रत्नागिरी -सिंधुदुर्ग दौर्‍यावरच का?

पंतप्रधान गुजरातला गेले अशी टीका करून आघाडीची नेतेमंडळी आपले अपयश झाकण्याचा प्रयत्न करीत आहेत

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे रत्नागिरी -सिंधुदुर्ग दौर्‍यावरच का?

sakal_logo
By
संतोष कुलकर्णी

देवगड (सिंधुदुर्ग) : पंतप्रधान(Prime Minister)केवळ गुजरातमध्येच (Gujrat)का गेले असे शिवसेनेसह महाविकास आघाडीची नेतेमंडळी म्हणत असेल तर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे(CM Uddhav Thackeray)राज्यात केवळ रत्नागिरी -सिंधुदुर्ग दौर्‍यावरच का येत आहेत, रायगड, कोल्हापूर, सातारा येथे ते का गेले नाहीत? असा पलटवार राज्याचे विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) यांनी आज येथे केला.

वादळाची पूर्व सुचना असतानाही येथे एन.डी.आर.एफ.चे पथक तैनात केले असते तर आपत्तीची तीव्रता कमी झाली असती. केवळ राजकीय टोलेबाजी करण्यापेक्षा सरकारने वेळीच सुरक्षा पुरवली असती तर मच्छीमारांवर मोठी आपत्ती ओढवली नसती असेही त्यांनी सांगितले.वादळामुळे झालेल्या नुकसानीची पहाणी करण्यासाठी फडणवीस येथील तालुका दौर्‍यावर आले असता ते बोलत होते.

Leader-of-Opposition-Devendra-Fadnavis-criticism-uddhav-Thackray-kokan-Tauktae-cyclone-visit-marathi- news

त्यांच्यासोबत विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, आमदार नीतेश राणे, माजी आमदार अ‍ॅड. अजित गोगटे, जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा सरचिटणीस जयदेव कदम, जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपे, नगराध्यक्षा प्रियांका साळसकर, माजी सभापती सुनील पारकर यांच्यासह अन्य नेतेमंडळी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. नुकसानीच्या केवळ कागदावर नोंदी आवश्यक नसून प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीचे योग्य नोंद प्रशासनाने घेतली पाहिजे. राज्य शासनाचा प्रशासनावर वचक नाही म्हणून अशी अवस्था असल्याची टीका फडणवीस यांनी केली.

हेही वाचा- 'मी वैफल्यग्रस्त नाही'; उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला

शिवसेनेचे कोकणवर प्रेम असल्याचे त्यांचे नेते वारंवार सांगतात, मग मागील निसर्ग वादळाची भरपाई अजून नुकसानग्रस्तांना मिळाली नाही हे वास्तव आहे. केवळ पंतप्रधान गुजरातला गेले अशी टीका करून आघाडीची नेतेमंडळी आपले अपयश झाकण्याचा प्रयत्न करीत आहेत. मुख्यमंत्री ठाकरे केवळ रत्नागिरी -सिंधुदुर्ग दौर्‍यावरच का येत आहेत? रायगड, कोल्हापूर, सातारा येथे ते का गेले नाहीत? असा प्रश्‍नही श्री. फडणवीस यांनी उपस्थित केला. दरम्यान, त्यांनी कुणकेश्‍वर येथील आंबा नुकसानीचीही पहाणी केली.

loading image
go to top