esakal | गिरणी कामगारांच्या घरांसाठी मुख्यमंत्री प्रयत्नशील 
sakal

बोलून बातमी शोधा

CM Will Try To Give Houses To Mill Workers

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गिरणी कामगारांना घरे मिळावीत म्हणून प्रयत्नशील आहेत. गिरणी कामगारांनी मिळालेली घरे विकून नयेत म्हणून कायदा करण्याचा प्रयत्न करणार आहेत. एप्रिलमध्ये देखील घरांची लॉटरी होईल.'' 

गिरणी कामगारांच्या घरांसाठी मुख्यमंत्री प्रयत्नशील 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - गिरणी कामगारांना घरे मिळावीत म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रयत्नशील आहेत. 1 मार्चला काढण्यात आलेल्या घरांच्या लॉटरीला प्राधान्य देऊन प्रीमियम देखील कमी केला असल्याची माहिती जिल्हा गिरणी कामगार संघाचे अध्यक्ष दिनकर मसगे यांनी आज येथील बैठकीत दिली. 
आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालयात गिरणी कामगार व वारसदारंची बैठक झाली. यावेळी दिनकर मसगे बोलत होते.

यावेळी शामसुंदर कुंभार, लॉरेन्स डिसोजा, राजेंद्र पडते, अभिमन्यू लोंढे, सुभाष परब, महादेव देसाई, रवींद्र नाईक, महादेव गावडे, प्रकाश धुरी, शुभांगी सांगेलकर, कृष्णा माधव, सुनिता नाईक, सुनिता सांगेलकर, रंजीता चव्हाण, मोहन ठाकूर, रवीना नाईक, प्रकाश गवस आदी गिरणी कामगार उपस्थित होते. 

श्री. मसगे म्हणाले, ""मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गिरणी कामगारांना घरे मिळावीत म्हणून प्रयत्नशील आहेत. गिरणी कामगारांनी मिळालेली घरे विकून नयेत म्हणून कायदा करण्याचा प्रयत्न करणार आहेत. एप्रिलमध्ये देखील घरांची लॉटरी होईल.'' 
गिरणी कामगारांना घरे मिळावीत म्हणून 1 मार्चला लॉटरी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 3896 घरांची काढण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या शब्दाखातर प्रिमीयम नऊ लाख 50 हजार रुपयांचा करण्यात आला. हा गिरणी कामगारांना दिलेला मोठा दिलासा आहे, असेही श्री. मसगे म्हणाले. 

गिरणी कामगारांसाठी खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, माजी पालकमंत्री आमदार दीपक केसरकर, माजी सचीन आहीर कायमच सोबत राहिलेले आहेत. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गिरणी कामगारांना घरे मिळावीत म्हणून प्राधान्य दिले आहे. यापूर्वी 11 हजार 999 एवढ्या घरांची लॉटरी काढण्यात आली होती. आता झालेल्या कामगारांच्या लॉटरीमुळे सुमारे 15 हजार 895 लोकांना घरे मिळालेली आहेत; मात्र 1 लाख 70 हजार गिरणी कामगार व वारसांची घरांची मागणी केली होती. यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गिरणी कामगारांची एकजूट महत्त्वाची आहे. या लॉटरीमध्ये जिल्ह्यातील गिरणी कामगारांना घरे लागली आहेत.जिल्हा गिरणी कामगार संघाच्या वतीने लॉटरीमध्ये त्यांची नावे आहेत त्यांना कागदपत्रे पूर्तता करण्यासाठी सहकार्य केले जाईल, असे श्री. मसगे यांनी सांगितले. 

loading image