सावधान : वाऱ्याचा जोर वाढला मच्छीमारांनो घ्या काळजी....

In coastal areas Hurricanes are forming in kokan
In coastal areas Hurricanes are forming in kokan
Updated on

मालवण (सिंधुदुर्ग) : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे चक्रीवादळ तयार होत असून दुपारी साडे बारा वाजल्यानंतर याचा परिणाम किनारपट्टी भागात दिसू लागला आहे. समुद्राच्या लाटांची उंची वाढली असून वाऱ्याने जोर धरण्यास सुरवात केली असल्याची माहिती मच्छीमारांनी दिली. 


दरम्यान चक्रीवादळात किनारपट्टी  भागात मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असल्याने या आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी एन. डी. आर. एफचे २३ कर्मचाऱ्यांचे एक पथक कालच मालवणात दाखल झाले आहे. 


हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानंतर जिल्ह्याच्या किनारपट्टीवर प्रशासनाने सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. यात मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, नौका अन्य साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावे, खाडी, नदीकिनारी वास्तव्यास असलेल्या ग्रामस्थांनीही आवश्यक ती खबरदारी घ्यावी अशा सूचना महसूल, मत्स्यव्यवसाय विभागाच्यावतीने करण्यात आल्या आहेत. काल मध्यरात्री चक्रीवादळ येथील किनाऱ्यावर धडकेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

त्यानुसार किनारपट्टी भागातील ग्रामस्थांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे अनेक ग्रामस्थांनी रात्र जागून काढली. मात्र वादळाचा परिणाम जाणवला नाही. मात्र पाऊस सुरू होता. आज सकाळपासूनच ढगांच्या गडगडासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. मात्र वाऱ्याचा जोर नव्हता. दुपारी साडे बारा वाजल्यापासून किनारपट्टी भागात वाऱ्याचा जोर वाढण्यास सुरवात झाली. समुद्री लाटांच्या उंचीतही वाढ झाल्याचे दिसून आले. वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळू लागल्याने किनारपट्टी भागात सर्वत्र घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com