ती विज्ञान विभागात (Science Department) अकरावीत शिकत होती. तिच्या खोलीतून कसलाच प्रतिसाद न आल्याने पोलिसांना कळविले. पोलिसांनी दरवाजा उघडल्यानंतर घटना समोर आली.
सावंतवाडी : एका महाविद्यालयीन युवतीने (College Girl) फॅनला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना काल सायंकाळी साडेचारच्या सुमारास येथे उघडकीस आली. पोलिस ठाण्यात (Sawantwadi Police) आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पोलिसांच्या प्राथमिक तपासात सततच्या एकटेपणाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे कारण समोर आले आहे.