Valentine Day Special : एकतर्फी प्रेमात पडलेल्याला  'व्हॅलेंटाईन डे' पडला महागात.. 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 14 February 2020

शहरातील एका महाविद्यालयात युवकाचे युवतीवर एकतर्फी प्रेम होते. त्याच्या मित्रांनी युवतीला "प्रपोज' करण्याचे दिलेले चॅलेंज युवकाने स्वीकारले.. मग वाचा पुढे..

बांदा( सिंधुदूर्ग) : "व्हॅलेंटाईन डे'ला प्रेम व्यक्त करणे आज महाविद्यालयीन युवकाला चांगलेच महागात पडले. युवतीला जबरदस्तीने प्रेम स्वीकारण्याची धमकी देणाऱ्या युवकाच्या श्रीमुखात लगावल्याने युवकाचा "रोझ डे' दिवशी सुरू झालेला एकतर्फी प्रेमाचा प्रवास आज "व्हॅलेंटाईन डे' दिवशी सकाळीच थांबला. कॉलेजच्या समाजमाध्यम समूहावर युवक ट्रोल झाल्याने युवतीने दिलेल्या प्रसादाची चर्चा शहरात रंगली. 

हेही वाचा- भडका उडाला आणि उध्वस्त झाले तिचे आयुष्य..

याबाबत सविस्तर माहिती अशी

 शहरातील एका महाविद्यालयात युवकाचे युवतीवर एकतर्फी प्रेम होते. त्याच्या मित्रांनी युवतीला "प्रपोज' करण्याचे दिलेले चॅलेंज युवकाने स्वीकारले. "रोझ डे' दिवशी त्याने युवतीला गुलाबाचे फुल देऊन मैत्री करण्याचा प्रयत्न केला. युवतीने मैत्री नाकारल्याने युवकासमोर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले. कोणत्याही परिस्थितीत "व्हॅलेंटाईन डे'ला युवतीला प्रेम व्यक्त करण्यासाठी भाग पाडण्याचा त्याने निश्‍चय केला.

हेही वाचा- कुडाळमध्ये या 50  अनधिकृत बांधकामांना बसणार चाफ...

मित्रांचे चॅलेंज पडले महागात

आज सकाळीच तो महाविद्यालयाच्या दारात युवतीला प्रेम व्यक्त करण्यासाठी वाट बघत होता. मित्रांनी दिलेले आव्हान स्वीकारत त्याने सर्वांसमक्ष प्रेम व्यक्त केले; मात्र युवतीने तत्काळ नकार दिला. आपल्या मित्रांसमोर नाचक्की होईल, या भीतीने युवकाने आपले प्रेम स्वीकारण्याची धमकीच युवतीला दिली; मात्र युवतीने रुद्रावतार धारण करत युवकाच्या श्रीमुखात भडकविल्याने तो खजील झाला. या घटनेची चर्चा समाजमाध्यम समूहावर झाल्याने हा युवक अधिकच ट्रोल झाला.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: College youth valentine day special story kokan marathi news