भडका उडाला आणि उध्वस्त झाले तिचे आयुष्य.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

injured in flash seriously milan dead in kudal kokan marathi news

दुपारी चूल पेटवित असताना अचानक भडका उडून गंभीर जखमी  झाली होती. तिला वाचविण्यासाठी गेलेल्या तिच्या सासू या सुध्दा जखमी झाल्या आहेत.

भडका उडाला आणि उध्वस्त झाले तिचे आयुष्य..

कुडाळ (सिंधुदूर्ग) : काल दुपारी चूल पेटवित असताना अचानक भडका उडून गंभीर जखमी झालेल्या  पिंगुळी शेटकरवाडी येथील सौ मिलन विजय मोर्ये  हीचे आज मध्यरात्री गोवा बांबूळी येथे दुःखद निधन झाले.

हेही वाचा- Valentines Day Special : अन् ते बनले खऱ्याखुऱ्या आयुष्यातले विठ्ठल - रुक्माई.... -
 
          
  गुरुवारी मिलन मोर्ये  ही दुपारी चूल पेटवित असताना अचानक भडका उडून गंभीर जखमी  झाली होती. तिला वाचविण्यासाठी गेलेल्या तिच्या सासू या सुध्दा जखमी झाल्या आहेत. मिलन मोर्ये काल घरात एकट्याच होत्या सासू व नवरा कामानिमित आजूबाजूला बाहेर गेले होते. मिलन दुपारी चूल पेटविण्यासाठी गेल्या असता अचानक भडका उडाला. तिने आरडाओरड  केला. 

हेही वाचा- Valentine Day Special - मेरा दिल खोले तो, तेरा दिल नजर आयेगा....

मिलन गंभीर भाजली गेल्याने

  मात्र घटनास्थळी सासू व नवरा यांनी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. ती गंभीर भाजल्याने ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले होते. तर सासूला येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले होते.  अधिक उपचारासाठी दोघीनाही गोवा येथे हलविण्यात आले होते.  दोघीवर उपचार सुरू असताना मिलनचे निधन झाले तर सासुची तब्बेत बरी आहे.  मिलनच्या मागे नवरा, तीन मुले, सासू ,दिर असा परिवार आहे. तिच्या या दुःखद निधनाने मोर्ये कुटुंबियावर दुःखाचा डोगर कोसळला आहे.