`माझ्या वाटचालीत महाराजांचे आशीर्वाद साथीला`  

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 फेब्रुवारी 2020

खेडशी - चांदसुर्या येथील स्वामी बाळ सत्यधारी महाराज अध्यात्मिक सेवाकेंद्रातर्फे अंधश्रद्धा निर्मुलन आणि व्यसनमुक्तीपर विशेष मेळाव्यात उच्च व तंत्रशिक्षण मंत्र उदय सामंत यांचा सत्कार करण्यात आला.

रत्नागिरी - खेडशी - चांदसुर्या येथील स्वामी बाळ सत्यधारी महाराज अध्यात्मिक सेवाकेंद्रातर्फे अंधश्रद्धा निर्मुलन आणि व्यसनमुक्तीपर विशेष मेळाव्यात उच्च व तंत्रशिक्षण मंत्र उदय सामंत यांचा सत्कार करण्यात आला.

हे पण वाचा - लहान भाऊ भोगतोय यातना म्हणुन मोठ्या भावाने दिली स्वतःची किडनी...

यावेळी मंत्री सामंत म्हणाले, माझ्या वाटचालीत व यशात महाराजांच्या आर्शिवाद आहेत. आजवर महाराजांनी 96 हजार व्यक्ती व्यसनमुक्त केल्या आहेत. त्यांच्या राष्ट्रीय कार्याची दखल घेऊन राज्य शासनाने त्यांना दोन वेळा व्यसनमुक्तीचा पुरस्कार दिला आहे.

हे पण वाचा - मुलाच्या लग्नादिवशीच आईचे रक्षाविसर्जन करण्याची आली त्याच्यावर वेळ...

यावेळी जिल्हा परिषद बांधकाम सभापती महेश तथा बाबू म्हाप यांचा सभापती झाल्याबद्दल स्वामींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. खेडशी गावचे सरपंच भिकाजी गावडे, मिरजोळेचे सरपंच एकनाथ मयेकर, कर्मचारी नेते सुधाकर सावंत, निवृत्त प्राचार्य प्रताप सावंतदेसाई, राजेश तोडणकर, सुभाष पाटील, खेडशी हायस्कूलचे शिक्षक सुभाष पाटील, संदीप घवाळी उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: combine superstition and addiction in ratnagiri