भाजपला बाळासाहेब तर शिवसेनेला अप्पासाहेबांची आठवण ; राजकीय वर्तुळात चर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाजपला बाळासाहेब तर शिवसेनेला अप्पासाहेबांची आठवण

भाजपला बाळासाहेब तर शिवसेनेला अप्पासाहेबांची आठवण

देवगड : भाजपचे केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी मुंबईत जन आशिर्वाद यात्रेदरम्यान शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला भेट दिल्याची घटना ताजी असतानाच आज येथील शिवसेनेच्या मच्छीमारांना भरपाई वाटप कार्यक्रमात भाजपचे माजी आमदार स्वर्गीय अप्पासाहेब गोगटे यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. त्यामुळे उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. यावरुन आता भाजपला ‘बाळासाहेब’ तर शिवसेनेला ‘अप्पासाहेब’ आठवल्याची चर्चा सुरू झाली होती.

भाजपचे केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या जन आशिर्वाद यात्रेला काल मुंबईपासून सुरूवात झाली. यात्रेदरम्यान आगावू जाहीर केल्याप्रमाणे त्यांनी मुंबईतील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला भेट दिली. यावरून राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले होते. यातून शिवसेना आणि भाजपमध्ये वाक् युध्द रंगले होते. ही घटना ताजी असतानाच आज येथील खाडीकिनारी ‘तौक्ते’ चक्रीवादळातील नुकसानग्रस्त मच्छीमारांना भरपाई रक्कमेच्या धनादेशाचे वाटप करण्याचा कार्यक्रम पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत यांच्यासंह शिवसेना अन्य नेते मंडळींच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता.

हेही वाचा: मित्रानेच केला मित्राच्या मुलाचा घात ; 'त्या' बालकाचा खूनच

यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबरच भाजपचे माजी आमदार स्वर्गीय अप्पासाहेब गोगटे यांच्या प्रतिमेचेही पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मात्र शिवसेनेच्या कार्यक्रमात अप्पासाहेबांची प्रतिमा पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. याच अनुषंगाने पालकमंत्री उदय सामंत भाषणात म्हणाले, अप्पासाहेबांचे विकासाचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम खासदार विनायक राऊत करीत आहेत. अप्पासाहेबांसोबत कधी गाड्यांचा लवाजमा नव्हता, एकटेच मतदारसंघात अप्पासाहेब फिरत असत. तसेच खासदार राऊतही एकटेच मतदारसंघ पिंजून काढीत आहेत असे सांगितले. एकूणच काय, भाजपला ‘बाळासाहेब’ तर शिवसेनेला ‘अप्पासाहेब’ तारणहार ठरणार काय? अशीच राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली होती.

Web Title: Compensation Distribution To Shiv Sena Fishermen Devgad Political News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..