completion of your work not only in for document work complete its urgency MLA yogesh kadam said in ratnagiri
completion of your work not only in for document work complete its urgency MLA yogesh kadam said in ratnagiri

अधिकाऱ्यांची भूमिका पाणी देण्याची असावी : योगेश कदम

मंडणगड : मंजूर कामे पूर्ण करताना फक्त कागदी घोडे न नाचविता अशी कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा, मंडणगड तालुक्‍यातील पाणीटंचाई सोडविण्यासाठी प्रशासनाकडून ठोस नियोजनाची आवश्‍यकता असून, परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचे तसेच कामात हलगर्जी केल्यास कार्यवाही करण्याचे निर्देश आमदार योगेश कदम यांनी दिले. 

मंडणगड तहसील कार्यालयात संभाव्य पाणीटंचाईचा कृती आरखडा तयार करण्यासाठी सभा झाली. ते म्हणाले, टंचाईवर मात करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी आपली मानसिकता बदलण्याची आवश्‍यकता आहे. तालुक्‍यातील पाणीटंचाईचा निपटारा करण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून नेमके कोणते प्रयत्न झाले, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर अधिकाऱ्यांनी समर्पक उत्तर दिले नाही.

टंचाई आराखड्यात वर्षानुवर्ष असणाऱ्या गाव-वाड्यातील पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी साखळी बंधारे बांधण्याच्या सूचना करत याचा तातडीने आराखडा तयार करण्याचे आदेश कदम यांनी दिले. या वेळी प्रांताधिकारी शरद पवार, तहसीलदार नारायण वेंगुर्लेकर, गटविकास अधिकारी आर. एम. दिघे, पंचायत समिती प्रभारी सभापती सुनील मोरे आदी उपस्थित होते. 

कामचुकारपणा करणाऱ्यांना कानपिचक्‍या 

आगामी काळात पाणीयोजनांचे प्रस्ताव सादर होण्यापूर्वी आवश्‍यक भूजल तपासणी अहवाल अग्रक्रमाने तयार करून घेतल्यास भविष्यात टंचाईसदृश्‍य परिस्थितीस सामोरे जावे लागणार नाही. अधिकाऱ्यांची भूमिका पाणी देण्याची असावी, असे सांगत कामचुकारपणा करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना आमदार योगेश कदम यांनी कानपिचक्‍या दिल्या.

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com