साटवलीतील शिवकालीन गढीचे संवर्धन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 जून 2019

लांजा - पुरातत्व विभाग, शासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या दुर्लक्षामुळे भग्नावस्था प्राप्त झालेल्या आणि झाडे-झुडपांनी आच्छादलेल्या साटवली येथील शिवकालीन गढीने अखेर मोकळा श्वास घेतला. दुर्गवीर प्रतिष्ठान रत्नागिरी, साटवली येथील स्थानिक ग्रामस्थ, लांजातील शिवगंध ढोल पथकाचे सर्व सदस्य आणि शिवप्रेमी यांनी रविवारी श्रमदान करून या गढीची साफसफाई करून खऱ्या अर्थाने शिवरायांचा वारसा जोपासण्याचे काम केले. 

लांजा तालुक्‍याच्या पश्विम भागात मुचकुंदी नदीकिनारी वसलेले साटवली हे गाव ऐतिहासिक काळात नावाजलेले बंदर होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात साटवली येथे व्यापारी माल उतरविण्यासाठी गढी म्हणजे एक छोटासा किल्ला होता. या ठिकाणी सागरीमार्गे येणारा सर्व प्रकारचा माल उतरविला जात असे. या गढीपासून 100 मीटर अंतरावर मालाची गलबते लागत असत. माल उतरविण्यासाठी या साटवली बंदराजवळ धक्का बांधला होता. 

छत्रपती शिवरायांच्या काळात जलमार्गे मालाची ने-आण करण्याच्या दृष्टीने महत्वाची भूमिका बजावणारे साटवली बंदर होते. शिवरायांच्या काळात व्यापाराच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्व असणाऱ्या व त्या काळात एक प्रमुख व्यापारी केंद्र म्हणून उदयास आलेल्या या साटवली गढीची सध्या अतिशय दुरवस्था झाली आहे. या भग्नावस्थेतील गढीला झाडे-झुडपांनी आच्छादले होते. पडझड झालेले गढीचे प्रवेशव्दार, पशुपक्ष्यांचा वावर याच गोष्टी दृष्टीस पडतात. 

शिवप्रेमींनी साटवली येथील स्थनिक लोकांना भेटून या गढीच्या परिसरात श्रमदान व स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत होते. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही आवाहन केले होते. याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. 
साटवली गढी परिसरातील वाढलेली काटेरी झुडपे, झाडे तोडण्यात आली. गवत, कचरा साफ करण्यात येवून परिसर मोकळा केला.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: conservation of Wada in Satvali in Ratnagiri