भुजबळांसारखी राणेंची अवस्था करण्याचा डाव

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 नोव्हेंबर 2016

चिपळूण- राणे कुटुंबीयांची अवस्था माजी मंत्री छगन भुजबळ आणि एकनाथ खडसे यांच्यासारखी करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. शिवसेना, भाजपचे नेते राणेंना राजकारणाच्या मैदानात हरवू शकत नाहीत, म्हणून सरकारच्या पगारावर चालणारी यंत्रणा आमच्या मागे लावण्याचे षड्‌यंत्र रचले जात आहे, असा आरोप माजी खासदार नीलेश राणे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला. 

राणे कुटुंबीयांची अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) चौकशी सुरू असून, कोणत्याही क्षणी राणे कुटुंबीयांना अटक होण्याची शक्‍यता असल्याची अफवा सोशल मीडियावर पसरली आहे. याबाबत माजी खासदार नीलेश राणे यांना विचारले असता ते म्हणाले, ""सरकारच्या सर्वच खात्यांमार्फत आमची चौकशी झाली. कुठेही गैरप्रकार आढळला नाही. नारायण राणे सभागृहात परत आले आहेत. शिवसेना, भाजपने त्यांची धास्ती घेतली आहे. मागील अधिवेशनात राणेंनी भाजप सरकारचे वाभाडे काढले. आता हिवाळी अधिवेशन जवळ आहे. सरकारला राणेंची भीती आहे. खरोखरच "ईडी'कडून आमची चौकशी सुरू असती, तर ही बाब माध्यमांपासून लपून राहिली नसती. अंजली दमानिया यांना पुढे करून खडसेंचा बळी दिला गेला. भुजबळांच्या संपत्तीची मुद्दाम चर्चा घडवून आणली गेली. त्यामुळे "ईडी'चे लक्ष भुजबळांकडे गेले. त्याचप्रकारे आमच्याकडे "ईडी'चे लक्ष जावे म्हणून मुद्दाम अशा अफवा पसरवल्या जात आहेत.'' 

माझ्या नावे 200 कंपन्या आणि बेनामी संपत्ती आहे, हे मला सोशल मीडियावरील अफवेतून समजले. ज्यांना कुणाला आमच्या संपत्तीची चौकशी करायची आहे, त्यांनी सरकारच्या संकेतस्थळावर जाऊन खुशाल चौकशी करावी. 
नीलेश राणे, माजी खासदार 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: conspiracy to target rane like bhujbal