पर्यटनमंत्री आदिती तटकरे आणणार ; मंडणगड किल्ल्याला साेनेरी दिवस... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Construction Of Tourist Destination On Mandangad Fort Ratnagiri Marathi News

मंडणगड किल्ल्यावर पर्यटनस्थळाची निर्मिती
आदिती तटकरे ; विकास आराखड्याबाबत चर्चा, साळुंखे यांचा पाठपुरावा....

पर्यटनमंत्री आदिती तटकरे आणणार ; मंडणगड किल्ल्याला साेनेरी दिवस...

मंडणगड (रत्नागिरी) :  मंडणगड किल्ल्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करणार असल्याचे सांगत उत्तम पर्यटनस्थळाची निर्मिती करणार असल्याचे राज्याचे पर्यटन मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. खासदार सुनील तटकरे यांनी दिलेल्या शब्दाचा पाठपुरावा करण्यासाठी मंडणगड राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष राकेश साळुंखे यांनी मंत्रालयात त्यांची भेट घेतली. 

आदिती तटकरे यांनी तालुक्‍यातील नागरिकांना या माध्यमातून विविध प्रकारचे थेट रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती साळुंखे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. खासदार सुनील तटकरे यांनी, लोकसभा निवडणुकीदरम्यान मंडणगड किल्ल्याला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी तालुक्‍याने मला अधिकचे प्रेम दिले आहे. आता मी तालुक्‍याला विकासात झुकते माप देण्याचा नेहमी प्रयत्न करीन, असे सांगितले होते.

हेही वाचा- धक्कादायक : सेजल कदमची जीवनातून एक्‍झिट -

विविध प्रकारची रोजगार निर्मिती
 आदिती तटकरे यांना योगायोगाने पर्यटन खात्याचे मंित्रपद मिळाले आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनाचा संबंधित खात्यातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य विकास आराखडा तयार करणार असल्याची माहिती दिली. यावेळी त्यांच्यासमवेत राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष अनिल घरटकर, मंडणगड किल्ल्याच्या नवतरुण विकास मंडळाचे सदस्य विकास शेटये, विजय राणे आदी उपस्थित होते.

क्लिक करा- कोकणात भरारी सायकल सवारी .... -

जिल्ह्याच्या नकाशावर सुंदर पर्यटनस्थळ
माजी आमदार संजय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आदिती तटकरे यांची भेट घेतली असून, लवकरच किल्ले मंडणगड याचा कायापालट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार सुनील तटकरे व आदिती तटकरे यांच्या साह्याने करून जिल्ह्याच्या नकाशावर एक सुंदर पर्यटनस्थळ म्हणून आणणार.
- राकेश साळुंखे, अध्यक्ष, युवक राष्ट्रवादी काँग्रेस, मंडणगड