धक्कादायक : सेजल कदमची जीवनातून एक्‍झिट

Young Artist Sejal Kadam Died Ratnagiri Martahi News
Young Artist Sejal Kadam Died Ratnagiri Martahi News
Updated on

 रत्नागिरी : "राजा सिंह' या महाबालनाट्यातील युवा कलाकार सेजल मिलिंद कदम (वय 16) हिचे ब्लड कॅन्सरने आज ता. 11 रोजी निधन झाले. उत्तम नृत्यांगना असणारी ही गुणी कलाकार अकाली गेल्याने कला क्षेत्रात दुःख व्यक्त होत आहे. पोलिस कर्मचारी मिलिंद कदम यांची ती मोठी मुलगी होती. 

हेही वाचा-  गौरी लंकेश हत्या प्रकरणाचे 'हे' कनेक्‍शन पुन्हा चर्चेत... - 

अहन क्रिएशनच्या राजा सिंह या नाटकात तिने महाराष्ट्र, मध्यप्रदेशसह दिल्लीपर्यंत झालेल्या प्रयोगांत भूमिका साकारली. ती सध्या अकरावीत शिकत होती. काही दिवसांपूर्वी तिला ब्लड कॅन्सरचे निदान झाले. कोल्हापूर येथे तिच्यावर उपचार सुरू होते. 20 दिवसात तिची आयुष्याशी झुंज सुरू होती, ती आज संपली. तिचा मृत्यू सर्वांनाच चटका लावून जाणारा होता. शनिवारी (ता. 11) तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तिच्या मागे दोन लहान बहिणी, आई-बाबा असा परिवार आहे. 


 हेही वाचा - सावधान ! सिगारेट ओढताय..
 

तेव्हा ती सहावीला होती 
राजा सिंहचे दिग्दर्शक केतन क्षीरसागर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, अहन क्रिएशनच्या शिबिरात सेजला पहिल्यांदा भेटलो होतो. तेव्हा ती सहावीला होती. तेव्हापण तिचा उत्साह व नवीन काही शिकण्याची जिद्द मनात जाणवायची. नंतर तिने फक्त नृत्य नव्हे; तर अभिनयाची चुणूक दाखवली. तिची एक्‍झिट खूपच धक्कादायक आहे. सतत हसतमुख सेजलचा चेहरा डोळ्यासमोरून जात नाही. 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Ratnagiri food safety raid on fake paneer
Mumbai Goa Highway landslide update
MNS threatens protest in Sudhagad Taluka against the installation of smart meters by Mahavitaran
ANS (Andhashraddha Nirmulan Samiti) and women's organizations in Pen organize 'Vatsavitri te Vatdharitri' campaign for tree plantation
Marathi News Esakal
www.esakal.com