esakal | कोकण : वीज वितरणच्या भोंगळ कारभाराचा फटका ग्राहकांना
sakal

बोलून बातमी शोधा

कोकण : वीज वितरणच्या भोंगळ कारभाराचा फटका ग्राहकांना

कोकण : वीज वितरणच्या भोंगळ कारभाराचा फटका ग्राहकांना

sakal_logo
By
पराग गावकर

कळणे : गणेशोत्सवाच्या पुरवसंध्येला विजेच्या लपंडाव सुरु आहे. गेल्या चार दिवसांपासून सासोली परिसरातील वीज वारंवार गायब होत आहे. हा प्रकार आज रात्रीही सुरूच आहे. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.

वीज वितरण कारभाराच्या भोंगळ कारभाराचा फटका ग्राहकांना बसत आहे. गेल्या चार दिवसांपासून सासोली वीज उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या कळणे, आडाळी, मोरगाव सह कोलझर परिसरातील गावातील वीज वारंवार गायब होत आहे. ऐन गणेशोत्सवाच्या तयारीची लगबग सुरु असताना विजेच्या या लपंडावाने ग्राहक हैराण झाले आहेत.

हेही वाचा: केंद्राच्या सुचनेवरुनच राणे कुटुंबियांविरोधात कारवाई - वळसे

11 केव्ही क्षमतेच्या वाहिनीतील सततच्या बिघडामुळे वीज पुरवठा अनियमित आहे. त्यात कहर म्हणजे आज रात्रीही अनेक ठिकाणी वीज गायब झाली. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय झाली. मुख्य वाहिनीच्या दुरुस्तीसाठी गावातील वायरमन अडकल्याने गावातील किरकोळ दुरुस्ती राखडल्याने ग्राहकांना मनस्तापला सामोरे जावे लागत आहे. गणेशमूर्ती शाळा, दुकाने आदीमध्ये गैरसोय होत आहे. उत्सवपूर्वी वीज पुरवठा नियमित राहण्यासाठी सज्जता आवश्यक असताना कंपनीकडुन योग्य खबरदारी घेतली नाही. या प्रकारची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी होतं आहे.

loading image
go to top