
रत्नागिरी: मुसळधार पावसामुळे चिपळुणात (Chiplun)भरलेले पाणी हॉस्पिटलमधील रुग्णांच्या जिवावर बेतले. पुरामध्ये कोविड सेंटर (Covid Center) असलेल्या अपरांत (Aparanta Hospital)हॉस्पिटलमधील ८ व अन्य सेंटरमधील २ अशा १० रुग्णांचा मृत्यू झाला. सेंटरमध्ये पाणी शिरल्याने ऑक्सिजनपासून संपूर्ण यंत्रणा ठप्प झाली. त्यामुळे ही परिस्थिती ओढवली. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. आतापर्यंत सुमारे १ हजार ४०० जणांना रेस्क्यू (Rescue)करण्यात आले आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी कोकण आयुक्त, निवासी जिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड आदी उपस्थित होते. (corona-10-patients-died-in-chiplun-Aparanta-hospital-information-uday-samant-rain-update-live-news-akb84)
सामंत म्हणाले, कोळकेवाडी धरणातील पाण्याचा विसर्ग हे एकच चिपळूण पुराचे कारण नाही. नवाजा आणि महाबळेश्वर येथे पडलेल्या पावसाचे पाणी चिपळूणमध्ये आले. त्यामुळे चिपळूणमध्ये गंभीर पूरस्थिती निर्माण झाली. कधी नाही एवढे म्हणजे ७ ते ८ फुट शहरामध्ये पाणी शिरले. नागरिकांना पुराचा अंदाज होता. म्हणून त्यांनी पहिल्या मजल्यापर्यंत सर्व साहित्य हलविले होते. मात्र पाणी दुसऱ्या मजल्यापर्यंत पोहचल्याने भयावह स्थिती निर्माण झाली. खेड येथील पोसरे गावात दरड कोसळून १७ जण अडकले आहेत. १० जण जखमी आहेत. खेडमधील आणखी एका घटनेत २ जण अडकले आहेत.
जिल्ह्यात आज १० जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये चिपळूण कोविड सेंटर असलेल्या अपरांत हॉस्पिटलमधील ८ जणांचा मृत्यू झाला. सेंटरमध्ये पाणी शिरल्याने ऑक्सिजनसह इतर सर्व यंत्रणा बंद पडली. त्यामुळे या बाधितांचा मृत्यू झाला. अन्य एका कोविड सेंटरमधील २ जणांचा मृत्यू झाला आहे. पाणी ओसरल्याने शहरात आणि फिरलो. अतिशय भयावह परिस्थिती आहे. अन्य काही घरांमध्ये मृदहेद असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढणार आहे.
आज सुमारे १४०० जणांना रेस्क्यू करण्यात आले आहे. चिपळूण येथे १५५ तर खेड येथे १५० जणांना स्थलांतरित करण्यात आले आहे. त्यांची मोठ्या हॉलमध्ये व्यवस्था केली आहे. सुमारे ५ हजार लोकांची जेवणाची व्यवस्था केली आहे. पाणी, सुखा खाऊ आदीची व्यवस्था केली आहे. जिल्हा प्रशासन, पोलिस, कस्टम, नौदल, आम्री, स्थानिक संस्था, तरुणांनी झोकून देऊन काम सुरू केले आहे. आज बाधितांना दिलासा देण्याची गरज आहे. वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. आजूबाजूच्या तलाठी, सर्कल आदींना बोलवून त्याचे तत्काळ पंचनामे करण्यात येत आहेत. तातडीच्या मदतीसाठी रात्री उशिरापर्यंत मुखमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा सुरू आहे. त्यावर लवकरच निर्णय होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
महाबळेश्वर, नवाजामधील पाणी चिपळुणात
महाबळेश्वरमध्ये झालेला ५३५ मिमी पाऊस, नवाजा ७६२ आणि चिपळूणमध्ये ६०० मीमी पडलेल्या पावासाचे पाणी चिपळूणध्ये आल्याने गंभीर पूरस्थिती निर्माण झाली. आज पाणी ओसरले असून चिपळुणात अतिशय भयावह परिस्थिती आहे. मदतीचा ओघ वाढत असून नागरिकांना दिलासा देण्यासाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.