लोटे एमआयडीसीत कोरोनाचा कहर; 39 कामगार बाधित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लोटे एमआयडीसीत कोरोनाचा कहर; 39 कामगार बाधित

लोटे एमआयडीसीत कोरोनाचा कहर; 39 कामगार बाधित

खेड (रत्नागिरी) : खेड (Khed)तालुक्यातील लवेल (Lavel)गावाजवळ भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने (Ministry of Railways)सुरू केलेल्या कारखान्यातील साडेतीनशे कामगारांच्या आरटीपीसीआर च्या चाचणीत 39 कामगार बाधीत आढळल्याने त्यांना कंपनीने गृहअलगीकरणात ठेवले आहे. टाटा कंपनी (Tata Company)हा प्रोजेक्ट पुर्ण करत आहे. येथे रेल्वेचे सुट्टे भाग तयार करण्याचा कारखाना तयार होत आहे.

Corona affected 39 workers at a factory in Lotte covid 19 update marathi news

हेही वाचा- ब्रेकिंग: कोल्हापूर जिल्ह्यात शनिवार रात्री 12 पासून कडक लॉकडाऊन

शासनाच्या नियमावली प्रमाणे ज्या कंपनीत अनेक कामगार काम करत असतील त्यांची आरटीपीसीआर चाचणी करणे सक्तीचे असल्याने या कंपनीने या कामगारांची मुंबईच्या एका प्रयोगशाळेत चाचणी करून घेतली होती. त्यात हे कामगार बाधीत आढळले. एका आठवड्यापुर्वी येथील दोन कामगार बाधीत आढळले होते. त्यामुळे बाधीतांच्या संख्येत वाढ झाल्याची माहिती लोटे प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.चेतन कदम यांनी दिली. याबाबत तालुका आरोग्य अधिकारी राजन शेळके यांनी दुजोरा दिला आहे.

ते म्हणाले की,आम्ही कंपनीने सुरू केलेल्या गृह अलगीकरणाला भेट देवून पाहणी केली असता सर्व प्रकारच्या सोई येथे कंपनीने उपलब्ध केल्या आहेत. तसेच कामगारांना इतर सुविधा दिल्या आहेत. बाधीतांपैकी सर्व कामगार व्यवस्थित आहेत. कोणालाही त्रास नाही असे ते म्हणाले. या कंपनीतील कामगारामुळे गावातील अन्य कोणालाही बाधा झालेली नसल्याचेही डॉ.शेळके यांनी सांगितले.

Corona affected 39 workers at a factory in Lotte covid 19 update marathi news

Web Title: Corona Affected 39 Workers At Factory Lotte Covid 19 Update Marathi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Ratnagiri
go to top